कथित रील स्टारच्या अडचणींत वाढ pudhari photo
ठाणे

Thane Crime : कथित रील स्टारच्या अडचणींत वाढ

एकविरा आईच्या जत्रेत कमरेला पिस्तूल लावलेले रील व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : 13 गुन्ह्यांची मालिका असलेला कथित रील स्टार सुरेंद्र पाटील याचे एकविरा आईच्या जत्रेत कमरेला पिस्तूल लावलेले रील व्हायरल झाल्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

देवीच्या जत्रेत कमरेला पिस्तूल लावून रील बनविण्यात आली. समाज माध्यमांवर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हायरल रीलचा क्राईम ब्रँचने चौकस तपास सुरू केला आहे. डोंबिवलीच्या या कथित रीलस्टारने शुक्रवारी 23 मार्च रोजी जत्रेदरम्यान एक रील तयार केली.

या रीलमध्ये त्याने कमरेला पिस्तूल खोचले होते. गुन्ह्यांची मालिका पाहता त्याचा अग्नीशस्त्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तरीही त्याने शस्त्र कसे काय वापरले? याचा तपास सुरू करण्यात आला आहे. क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने घरात घुसून त्याने मोठ्या खुबीने लपविलेला घातक शस्त्रांचा साठा बाहेर काढला.

ही कारवाई करण्यासाठी क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने कौशल्य पणाला लावले होते. ही शस्त्रे आपण रील्ससाठी प्रॉप्स म्हणून ठेवल्याचे सांगणाऱ्या या पठ्ठ्याने शस्त्रांचा इतका साठा कुठून आणला? या शस्त्रास्त्र कांडात आणखी कुणी सामील आहे का? याचा चौकस तपास 4 एप्रिलपर्यंत क्राईम ब्रँचकडून केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT