Dhule Theft Case | साक्री तालुक्यात कॉपर केबल चोरी करणाऱ्या गँगमधील ३ जणांना पाठलाग करून पकडले

सुमारे २ लाख रुपये किंमतीची तांब्याची तार जप्त
Sakri copper cable theft
कॉपर केबल चोरी करणारी गँग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने गजाआड केलीPudhari
Published on
Updated on

Sakri copper cable theft

धुळे : साक्री तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातुन कॉपर केबल चोरी करणारी गँग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने गजाआड केली आहे .या टोळीने तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख रुपये किंमतीची तांब्याची तार जप्त करण्यात आली आहे.

साक्री तालुक्यातील कासारे छाईल परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पातून सुमारे 45 हजार रुपये किमतीची ताब्याची तार चोरून नेल्याची घटना घडली होती. या संदर्भात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला.

Sakri copper cable theft
Dhule Crime News | धुळ्यात सोनसाखळी चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करून अटक

यात पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना शेवाळी फाट्यावर एका गाडीमध्ये चोरीची तांब्याची तार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी कारवाई करण्याचे नियोजन केले. यासाठी सपोनि नामदेव सहारे व पोलीस अंमलदार सदेसिंग चव्हाण, तुषार सुर्यवंशी, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, योगेश जगताप, अमोल जाधव व अमोल पाटील या पथकाने साक्री नजीकच्या शेवाळी फाट्यावर गाड्यांची तपासणी सुरू केली.

यावेळी त्यांना शेवाळी शिवारातील बजरंग हॉटेल समोरील महामार्गावर पिकअप (एम एच-19/ बी एम -3268) ही गाडी संशयितरित्या आढळली. त्यामुळे पोलीस पथकाने गाडीच थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकांनी पोलीस पाहून गाडी पळवण्यास सुरुवात केली. अखेर पाठलाग करून या गाडीत ताब्यात घेण्यात आले.

Sakri copper cable theft
Dhule Crime News | धुळे जिल्ह्यातील मुलीवर चोपडा येथे अत्याचार; नराधमाला अटक

गाडीमधून सुमारे दोन लाख रुपये किमतीची ताब्याची तार जप्त करण्यात आली असून मच्छिद्र भटु जाधव, प्रविण रविंद्र जाधव, सुलतान नुरा शहा या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची प्राथमिक चौकशी केली असता या तिघांनी साक्री पोलीस ठाणे अंतर्गत दोन आणि निजामपूर पोलीस ठाणे अंतर्गत एका ठिकाणी तांब्याच्या तारेची चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या गॅंग मधील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news