ठाणे महापालिकेत मोडले मताधिक्यांच्या निच्चांक- उच्चांकांचे विक्रम pudhari photo
ठाणे

Thane municipal election analysis : ठाणे महापालिकेत मोडले मताधिक्यांच्या निच्चांक- उच्चांकांचे विक्रम

योगेश जानकर यांचा 15 हजार 720 मतांचा विक्रम; विक्रांत वायचाल यांचा 158 मतांचा निच्चांक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत मताधिक्यांचे उच्चांक आणि निच्चांकाचे दोन्ही विक्रम मोडीत निघाले आहेत. शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांनी सर्वाधिक 15 हजार 720 मते घेऊन नवा विक्रम प्रस्थापित केला असून शिवसेनेच्याच विक्रांत वायचाल यांनी सर्वात कमी 158 मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. पालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला केणी यांनी सर्वाधिक 10, 742 मते आणि शिवसेनेचे नगरसेवक संजय पांडे यांचा अवघ्या 13 मतांनी विजय मिळविला होता.

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची महायुती आणि एनसीपी (एसपी ), ठाकरे शिवसेना आणि मनसे यांची महाविकास आघाडी यांच्या थेट लढत अपेक्षित असताना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून महाविकास आघाडीला कमजोर बनविले. एनसीपी आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची रणनीती यशस्वी ठरली.

या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे उमेदवार पाडून वचपा काढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमुळे महाविकास आघाडीचे 12 नगरसेवक कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले. त्यामध्ये काँग्रेस शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची राजकीय आत्महत्येचा समावेश आहे. त्यांचा देखील उबाठाच्या उमेदवाराला विभागलेल्या मतांमुळे पराभव झाल्याने काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

ठाणे महापालिकेच्या 131 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक 15 हजार 720 मते घेऊन सेनेचे योगेश जानकर यांनी विक्रम केला आहे. दुसऱ्या क्रमांकांची 15 हजार 256 मते ही भाजपच्या कमळ चौधरी यांनी घेतली असून सेनेचे मंदार केणी यांनी तिसऱ्या क्रमांकांची 15 हजार 156 मते घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धूळ चारली. पहिल्यांदा निवडणूक लढविणारे सेनेचे संतोष तोडकर यांनी 13 हजार 747 मते आणि सेनेच्या नम्रता भोसले यांनी 13 हजार 17 मते मिळवत चौथा आणि पाचव्या क्रमांकांची मते घेतली आहेत.

दुसरीकडे शिवसेनेचे विक्रांत वायचाल यांचा सर्वात कमी 158 मतांनी विजय मिळाला आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर भगत यांना 192 मते, सेनेचे अनिल भोरे 246 मते आणि एनसीपीचे आजमी शहलाम शाहिद यांचा 577 मते आणि भाजपच्या अनिता यादव 593 मतांच्या कमी फरकाने विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव करणारे उबाठा गटाचे एकमेव नगरसेवक शाहजी खुस्पे 667 मतांनी केला. त्याच पॅनलमधील सेनेचे अनिल भोर यांचा अवघ्या 246 मतांनी उबाठाच्या उमेदवारावर निसटता विजय झालेला आहे.

शिवसेनेच्या नगरसेविका अनिता गौरी यांनी पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार सुरेखा पाटील यांचा 708 मतांच्या फरकाने पराभव केला. 2017 च्या निवडणुकीत गौरी यांनी सुरेखा पाटील यांचा 517 मतांनी पराभव केला होता. त्यावेळी पाटील ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढविली होती.

सर्वाधिक विजयी मताधिक्य

योगेश जानकर (शिवसेना) 15,720

कमळ चौधरी (भाजप ) 15,256

मंदार केणी (शिवसेना) 15,156

संतोष तोडकर (शिवसेना) 13,747

सर्वात कमी मताधिक्य

विक्रांत वायचाल (शिवसेना) -158 मते

सुधीर भगत (एनसीपी (एसपी) - 192 मते

अनिल भोर (शिवसेना) -246 मते

आजमी शहलाम शाहिद (एनसीपी) -577 मते

अनिता यादव (भाजप) -593 मते

महापौरपदाच्या दावेदारांचे मताधिक्य

डॉ. दर्शना जानकर - 12 हजार 709

वनिता घोगरे - 7 हजार 419

विमल भोईर - 5 हजार 329

गणेश कांबळे - 2 हजार 114

पद्मा भगत - 2 हजार 99

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT