ठाणे : मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. लाखो प्रवासी दररोज लोकलने प्रवास करतात. मात्र अनेकदा लोकल प्रवासामुळं नागरिकांवर हैराण होण्याची वेळ येते. लोकल वेळेत पोहोचली नाही तर अनेकांना ऑफिस गाठायला उशिर होतो. 90 टक्के मुंबईकर हे लोकलच्या वेळापत्रकानुसार दिवसाचे नियोजन आखतात. लोकल लेट झाली तर ऑफिसमध्ये लेटमार्क लागतो. पण लवकरच मुंबईकरांचा लेटमार्क टळणार आहे. मध्य रेल्वेने एका अतिमहत्त्वाचा प्रकल्प मार्गीस लावला आहे.
कर्जत स्टेशन आणि यार्च रिमॉडेलिंग करून आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग सुरू केले आहे. सुमारे 30 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रकल्प अखेर 74.53 कोटी रुपये खर्च करून पूर्ण केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) खोपोली आणि पनवेल वरून कर्जत मार्गे धावणाऱ्या 88 लोकल, 100 पेक्षा जास्त एक्स्प्रेसचा वक्तशीरपणा 5 ते 10 मिनिटांनी वाढणार आहे.
मध्य रेल्वेने यार्ड रिमॉडेलिंगसाठी दहापेक्षा जास्त दुपारचे ब्लॉक आणि 11 आणि 12 तारखेला मिळून 15 तासांपेक्षा जास्त कालावधीचा मेगाब्लॉक घेतला होता. यामुळं यार्डची क्षमता 25 टक्क्यांनी वाढली आहे. कर्जत-पळसदरी दरम्यान नवीन चौथा मार्ग तयार झाला असून, खोपोली पनवेलवरून पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी दोन्ही दिशांच्या माल गाड्या, एक्स्प्रेसला आता कर्जत मार्गे जाण्याची गरज भासणार नाही.
हे हस्तांतर का होत आहे?
25 वर्षांपूर्वी सिडकोने ही स्थानके उभारली होती, पण देखभाल आणि दुरुस्तीच्या जबाबदाऱ्यांवर दोन्ही संस्थांमध्ये मतभेद आहेत. सिडकोकडून जबाबदारी घेण्यास सांगितले असले तरी, रेल्वेने दुरुस्तीनंतरच ताबा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानकांची चांगली देखभाल होईल.
487 रूट्स, 46 मुख्य सिग्नल, 39शंट सिग्नल बदलले.
सुरक्षिततेसाठी ड्युअल डिटेक्शन सिस्टम बसविली
कर्जत-भिवपुरी दरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग
रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी इफ्ट्रॉनिक्स डेटा लॉगर
8 पुलांचे विस्तार, 2 फूटओवर ब्रीजचे विस्तार आणि 4.9 किमी नवीन ट्रॅक जोडणी 9 ट्रॅक किमी अंतराची नवीन ओएचई वायरिंग, 350 मास्ट उभारले आणि यार्डचे पूर्ण विद्युतीकरण.
20 नवीन टर्नआउट्स बसवले आणि 8 जुने टर्नआउट्स काढले गेले.
1. मध्य रेल्वेने कर्जत स्टेशन आणि यार्ड रिमॉडेलिंग करून आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) सुरू केले आहे. हा प्रकल्प सुमारे 30 वर्षांपासून प्रलंबित होता आणि तो 74.53 कोटी रुपयांच्या खर्चाने पूर्ण करण्यात आला आहे
2. सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल. स्थानकांची आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण झाल्यानंतरच मध्य रेल्वे ती नव्या स्वरूपात स्वीकारेल. 20-25 वर्षे जुन्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करून हस्तांतर केले-जाईल.