

Central Railway Kalyan Diva Special Block
मुंबई : मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकात 12 मीटर रुंद पादचारी पुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी अप आणि डाऊन जलद मार्ग तसेच 5व्या आणि 6व्या मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 आणि 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री दिवा ते कल्याण (सर्व क्रॉसओव्हर्स वगळता) विभागात हा ब्लॉक असेल.
ब्लॉकची वेळ
5 आणि 6 मार्गावर रात्री 00.20 ते 03.20 वाजेपर्यंत (3 तास)
डाऊन आणि अप जलद मार्गावर रात्री 01.20 ते 03.20 वाजेपर्यंत (2 तास)
अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन :
गाडी क्रमांक 22104 कल्याण येथे 25 मिनिटे थांबवली जाईल.
गाडी क्रमांक 12102 कल्याण येथे 20 मिनिटे थांबवली जाईल.
गाडी क्रमांक 18030 खडवली येथे 10 मिनिटे थांबवली जाईल.
गाड्यांचे नियमन आणि डायव्हर्जन्स:
डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या :- गाडी क्रमांक 11041, 22865, आणि 22538 दिवा ते कल्याणदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील.
अप मेल/एक्स्प्रेस गाड्या : गाडी क्रमांक 11020 आणि 18519 कल्याण-पनवेलमार्गे डायव्हर्ट केल्या जातील आणि कल्याणमध्ये प्रवाशांना उतरण्यासाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबे दिले जातील.