ठाणे : पुढारी वृत्तसेवा
प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित केले आणि आपल्याला काय हवं याचा शोध घेतला तर आपले करियर निवडणे सहज सुलभ होईल आणि त्यातूनच स्वतःच्या ध्येय निश्चितीचे शिल्पकार होऊ शकतो, असा करियर मंत्र महाराष्ट्र क्लासेस ओनर असोसिएशनचे अध्यक्ष प्रजेश ट्रोस्की यांनी दिला. दैनिक पुढारी एज्य विशा २०२५ या दोन दिवसाच्या शैक्षणिक मार्गदर्शन शिविराचे उद्घाटन शुक्रवारी झाले यावेळी ते बोलत होते.
दहावी बारावीनंतर करिअरच्या अनेक वाटा खुल्या होतात, सध्याच्या विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक पर्याय आहेत, मात्र करिअरची निवड कशी करायची, त्यासाठी कोणते अभ्यासक्रम आहे. त्यात स्वतःच्या आवादीला कसे प्राधान्य द्यायचे, बाजारपेठेत कुठल्या अभ्यासक्रमाला मागणी आहे, अशा विविध क्षेत्रात करिअरमध्ये असलेल्या पर्यायांची (ऑप्शन्स) निवड कशी करायची, याचा कानमंत्र पुढारी एज्यु दिशा उपक्रमात शनिवारी विद्याध्यर्थ्यांना मिळाला. या उपक्रमाला पहिल्या दिवशी विद्याथ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
१०वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्याध्यर्थ्यांच्या करियर निवडीला योग्य दिशा देण्यासाठी 'दैनिक पुढारी'तर्फे 'एज्यु दिशा' या विशेष मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ३० मे आणि शनिवार, ३१ मे या दोन दिवशी हे मार्गदर्शन शिबीर हॉटेल टिप टॉप प्लाझा, ठाणे आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅन्ड मशीन लर्निंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महेश गायकवाड, पारूल युनिव्हसिटीच्या आऊटरिच मॅनेजर श्रुती डुचे, टिप टॉप प्लाझाच्या स्मिता रोहितभाई शहा, दैनिक पुढारीचे नॅशनल हेड संजीव कुलकर्णी, दैनिक पुढारीच्या ठाणे-रायगड-पालघर आवृत्तीचे निवासी संपादक शशिकांत सावंत, मुंबई युनिट मार्केटिंग हेड अमित तळेकर, कर्नावट क्लासेसचे सचिन कर्नावट यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात दैनिक पुढारी १९२९ साली सुरू इटला तो काळ स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता. इंग्रजांना चले जाबचा इशारा दिला गेला होता. या लढाला समर्पित होऊनच या दैनिकाची निर्मिती झाली. सैनिकांसाठी सियाचीन येथे रुग्णालय, पूसास्तांना मदत असे उपक्रम दैनिक पुढारीने राबवले. त्याच पद्धतीने मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडावे म्हणून हा शैक्षणिक उपक्रम आयोजित केला आहे. चासाठी निद्याथ्यांनी दिलेला अभूतपूर्व असा प्रतिसाद या यशाचे गमक असल्याचे सांगितले. दैनिक पुढारीचे नॅशनल हेट संजीव कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
संजय घोडावत चुर्निव्हर्सिटीचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅन्ड मशीन लर्निंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महेश गायकवाड, पारूल युनिव्हसिटीच्या आऊटरिच शिक्षणात व्यावहारिक दृष्टिकोन महत्त्वाचा-श्रुती डुचे पारूल युनिव्हसिटीच्या आऊटरिथ मॅनेजर श्रुती दुचे म्हणाल्या, आधुनिक शिक्षणात तंत्रज्ञानावर भर असला तरी त्यातही आता ज्ञानशाखांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पूर्वी अभियांत्रिकी शाखेत तीन चार ज्ञानशाखा असायच्या आता त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक अशा शाखांची भर पडते आहे. कोरोनासारख्या आपत्तीनंतर तर विविध क्षेवात अभ्यासक्रमांच्या आणि करियरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी गुरुकुल पद्धती असायचो. तिथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असे. आता एकाच वेळी विद्याथ्यांना दुसऱ्या क्षेत्रातही करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. पूर्वी दहावीनंतर पारंपरिक विद्याशाखांचा पर्याय विद्याथ्यांना असायचा आणि पुढील ४०-५० वर्षांचा विचार करून तेव्हा विद्यार्थी करिअरची निवड करत असत; परंतु आता शिक्षणात व्यावहारिक दृष्टिकोनाला महत्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहार ज्ञान देणाऱ्या शिक्षणाची निवड करण्याकडे कल वाहत असल्याचे मत डुचे यांनी व्यक्त केले.
मॅनेजर श्रुती डुचे यांची मुलाखत पुढारी न्यूज वृत्तवाहिनीचे करणसिंग पवार यांनी घेतली. यामध्ये नवे शैक्षणिक धोरण, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या नव्या संधी, शिक्षण घेतानाच चित्रकला, अभिनय, क्रीडा या वेगवेगळ्या क्षेत्रात सक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वव्यापी शिक्षणाचे उपलब्ध असलेले पर्याय या विषयावर चर्चा केली. या उपक्रमात प्रवेश ट्रोस्की यांचे मार्गदर्शन सर्वव्यापी झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना कष्टाचे फळ नेहमीच चांगले असते, असे सांगत स्वायत्त आणि खासगी विद्यापीठांचे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्री तसेच विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण कसे घेता येईल, याची माहिती देणारे आहे. तुम्हाला जे आवडते, ते तुम्ही शिक्षण घ्या, कुणाच्या दबावाखाली अभ्यासक्रम निवडू नका. स्वतःमधील स्व्त्वाचा शोध घ्या आणि आपल्या शैक्षणिक टप्प्याची उत्तम जाणिवेने निवड करा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्यातल्या 'मी' चा शोध घ्या. तुम्ही काय होणार आहात, याची दिशा ठरवताना दिशाहीन न होता, ध्येयनिष्ठ व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छित शैक्षणिक ध्येकसाठी प्रवत्न करर्ताना अभ्यासात सातत्य ठेवण्याची गरज आहे. महाविद्यालयात शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा रोज घरी सराव केला, तर विद्याश्यांना कोणतेही अवघड वाटत नाही, कृत्रिम बद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे नोकल्या जाण्याची भीती आहे, पण या तंत्रज्ञानामुळे कितीही नोकल्या गेल्या तरी तेवढ्याच नोकन्या निर्माणही होगार आहेत, हे लक्षात घ्या, कोणतेही तंत्रज्ञान आले तरी कष्टाला पर्याय नाही, असा यशाचा मंत्र संजय घोडावत पुर्निव्हर्सिटीचे आर्टिफिशयल इंटेलिजन्स अॅन्ड मशीन लर्निंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शनिवारपर्यंत चालणार शिक्षणाच्या नव्या दिशा शैक्षणिक उपक्रम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचे स्वरूप बदलले आहे. या धोरणात पारंपरिक शिक्षणपद्धतीला फाटा देण्यात आला असून कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे, त्यामुळे शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाल्याचे निरीक्षण गायकवाड यांनी नोंदवले करिअरची निवड करताना भविष्यात बाजारात कुठल्या प्रकारच्या तंत्रज्ञान किया कौशल्यावर आधारित रोजगार उपलब्ध असतील, शिक्षण पद्धतीत नवे काय अभ्यासक्रम आहेत, याचा वेध विद्याध्यांनी घेण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले.
पूर्वी विद्याध्यांपुढे शाख, वाणिज्य आणि कला या तीन सारासार विचार करून करियरची निवड करा. स्वतःची इच्छा, आवड, जिज्ञासा, बाजारात दीर्घकाळ असलेले रोजगार याचा सारासार विचार करून विद्यार्थ्यांनी करियरची निवड करावी, असा सल्ला महाराष्ट्र क्लासेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष व प्रजेश ट्रोस्की यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनातील उदाहरणे देत योग्य करियरची निवड कशी करावी या विषयावर हसत खेळत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला विद्याथ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्याशाखांचे पर्याय असत. गणित आणि विज्ञान चांगले असलेले विद्यार्थी हमखास शास्त्र शाखेत जात असत, गणित चांगले असलेले वाशिगज्य तर भाषा विषयांची आवड असलेले कला शाखेकडे जात. पण, शास्त्र शाखेकडे जातांना गणित चांगलं नाही म्हणून शाखेकडे न जागाच्या विद्याथ्यर्थ्यांना पुढे एमबीए सारख्या अभ्यासक्रमात गणित आडवे यायचे, त्यामुळे विद्याथ्यांनी आपल्या आवडत्या विषयाला प्राधान्य देऊन विद्याशाखेची निवड करावी, असे आवाहन ट्रोस्की यांनी केले. अनेक विद्या शाखा असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमाची निवड करताना गोंधळ होतो. तसेच विद्यार्थी अनेकदा मित्र ज्या अभ्यासक्रमाची निवड करतो, त्याचीच निवड करती, तर कधी पालकांच्या दबावामुळे किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते सांगतील त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात, त्यामुळे विद्याथ्यांनी आपली आवड, क्षमता लक्षात घेऊन प्रवेश घ्यावा. प्रत्येक विद्याथ्यांत हुशारी असते, ती हुशारी, वे कौशल्य शोधून काढण्याचे काम शिक्षणामुळे होते.
शिक्षणाने स्वतंत्र विचारसरणी विकसित होते. त्यामुळे विद्याथ्र्यानी करिअरची निवड सारासार विचार करून करावी, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन पुढारीच्या प्रतिनिधी श्रद्धा शेवाळे कांदळकर यांनी केले.
अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला मुलांना यशाचा मूलमंत्र कुठल्याही ध्येयाच्या मागे पळताना प्रचंड मेहनत आणि पॉझिटिव्ह थिंकिंग गरजेचे असते. मोबाईलचा शत्रू दूर सारून एकाग्रपणे अभ्यास केला आणि प्रचंड मेहनत केली, तर कुठलेच यश हे अशक्य नाही, अशा शब्दात अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र दिला.
दैनिक पुढारी एज्यु दिशा २०२५ या शैक्षणिक चर्चासत्रात विश्वास नांगरे पाटील यांनी आयपीस होताना... या विषयावर आपले अनुभव सांगितले. मुंबईसारख्या महानगरात कुणी नसताना मिळेल तिथे राहून १८ तास मेहनत करून अभ्यास केला, तेव्हा मला यश मिळाले. पयश मिळण्यासाठी ध्येय आणि सकारात्मक ऊर्जा या गोष्टी महत्वाच्या असतात आणि चिकाटी, मेहनत, दररोज पुढे जाण्याची अतिव इच्छाशक्ती याची खूप गरज आहे. आपण थोडा अभ्यास केला तरी थकतो. मोबाईलच्या शत्रूसंगे वेळ वाया घालवतो. या गोष्टी टाळल्या आणि यशाच्या मागे मेहनतीने थावली, तर तुम्हीही चांगले पोलीस ऑफिसर होऊ शकता, असा मूलमंत्रही त्यांनी विद्याथ्यांना दिला. मी मुंचईत आलो तेव्हा कधी आमदार निवासात तर कधी वांगणीसारख्या ग्रामीण भागात राहिलो. पहाटे ३ वाजता लोकल रेल्वे पकडून मुंबईत वावची लायब्ररीत बसून १२ तास अभ्यास करायचो. या मेहनतीमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचलो. तुम्हीही यश मिळविण्यासाठी मेहनत करा. यश तुमची वाट पाहात उभे राहील, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले.