Karjat Monsoon Tourism : कर्जतमधील पावसाळी पर्यटनावर बंदी आणू नये
कर्जत : हेमंत देशमुख
कर्जत आणि खालापूर तालुक्यांत पर्यटकांना पावसाळी पर्यटनासाठी कोणत्याही प्रकारची बंदी करू नये, असे आवाहन करणारे पत्र आमदार महेंद्र धोरवे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना दिले आहे. कर्जत तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले असून त्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याने प्रशासनाने पावसाळी पर्यटनास बंदी करू नये, अशी सूचना आणि मागणी आमदार थोरवे यांनी केली आहे.
कर्जत तालुक्यात पावसाळ्यात १४४ कलम लागू करून पर्यटनावर निबंध घालण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार थोरवे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात काही सूचना प्रशासनाला केल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, पर्यटनावर निर्बंध घालण्यात कलम १४४ लावण्याचे कारण कर्जत तालुक्यात अनेक सुंदर असे धबधबे आहेत तसेच सोलन पाडा सारखे डॅम सुद्धा आहेत मात्र गेले कित्येक वर्ष पर्यटनासाठी येणाऱ्या काही पर्यटकांचा निष्काळजीपणामुळे मृत्यू होत आहे.
दरवर्षीच पर्यटकांचा मृत्यू होत असल्याने अखेर पर्यटकांच्या जीविताचा विचार करून तथा सुरक्षिततेचा विचार करून ज्या ज्या गाव परिसरात धबधबे डॅम आहेत तेथे शासनाने मागील काळात पावसाळ्यात विशिष्ट कालावधी करता १४४ कलम लागू केले होते. मात्र यामुळे पर्यटकांचा तर हिरेमोड होतोच याशिवाय या वर्षा सहलीच्या मुळे मिळणारा स्थानिकांचा रोजगारही बुडतो.
आल्याने स्थानिक तरुणांचे, हॉटेल, ढाबे, भाजीविक्रेते, दुग्ध व्यवसायिक यांचे मोठे नुकसान होत असते. कर्जत तालुका निसर्गसंपन्न असून संपूर्ण महाराष्ट्रातून येथे पर्यटक येतात. विशेषतः, पावसाळ्यात डोंगरदऱ्या, धबधबे, निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी कुटुंबासह पर्यटक मोठ्या संख्येने कर्जतकडे वळतात. अशा काळात स्थानिक लोक पर्यटकांना जेवण, राहण्याची सोय, स्थानिक उत्पादने, भाकरी, भाजीपाला अशा माध्यमातून रोजगार मिळवतात.
आमदार थोरवे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की १४४ कलम लागू करून बंदी घालण्यापेक्षा स्थानिक प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या विभागाने विविध विभागांच्या बैठका लावून पर्यटकांची सुरक्षा यावर भर द्यावा आणि आवश्यक असल्यास आपण देखील बैठकीत उपस्थित राहून योग्य मार्गदर्शन करू, त्यांनी सूचित केले की, प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत १४४ कलम लावले; परंतु हा पर्याय टाळण्यासारखा आहे.
योग्य नियोजन, सुरक्षा व्यवस्था, स्थानिक स्वयंसेवकांची मदत, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन सेवा यांचा समावेश करून पर्यटन सुरळीत ठेवणे शक्य आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, पर्यटनावर विचारविनिमय करण्यासाठी पर्यटनस्थळी व्यवसाय करणारे यांची बैठक आयोजित करावी. कर्जत प्रांताधिकारी यांच्या अधीन असलेली यंत्रणा त्वरित कार्यान्वित्त कराव्यात. स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी भर द्यावा. कर्जत तालुक्यात पावसाळा सुरू होताच प्रशासनाकडून कलम १४४ लागू केले जाते आणि त्यामुळे पर्यटकांना पाणवठ्याच्या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात येते. याचा थेट फटका स्थानिक पर्यटनावर आधारित असलेल्या रोजगारास बसत आहे.

