Pradeep Purnekar Death Case pudhari
ठाणे

Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; पळून जात असलेल्या दोन मुख्य आरोपींना अटक

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी गोवा येथे पळ काढण्याच्या तयारीत असतानाच ठाण्याच्या गुन्हे शाखेने या दोन आरोपीना अटक केली आहे.

Anirudha Sankpal

Pradeep Purnekar Death Case Update: ठाण्यातील उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे पोलिसांवर लवकरात लवकर आरोपींना पकडण्याचा दबाव आहे. पोलिसांना आज या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी गोवा येथे पळ काढण्याच्या तयारीत असतानाच ठाण्याच्या गुन्हे शाखेने या दोन आरोपीना अटक केली आहे. वाहने बदलून नितेश पवार व निखिल यादव हे गोवा येथे जात होते. फरार आरोपींपैकी हे दोन आरोपी देखील महत्वाचे असून ते पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर चौकशी दरम्यान मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

गुरूवारी पाच जणांना चौकशीसाठी घेतलं होतं ताब्यात

दरम्यान, ठाणे क्राईम ब्रांच विशेष तपास पथकाने गुरूवारी पहाटे तीन महिला आणि दोन पुरूषांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. घटना घडली त्यावेळी पप्या शिंदेला अटक करण्यात आली होती. तर संतोष कनोजिया फरार होता. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले हे पाच जण सतत पप्या शिंदेच्या संपर्कात होते.

तपासासाठी विशेष पथकाची स्थापना

राजकीय दबाव वाढत असल्याचे पाहून ठाणे पोलिसांनी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार केलं आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह २३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे.

एकूण ९ पथके तैनात केली असून त्यातील २ पथके ही परराज्यात तपासासाठी गेली आहे. मंगळवारी रात्री प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून आणि धारदार शस्त्रांनी वार करून निघृण हत्या केली होती.

महिनाभरापूर्वीच रचला होता कट

प्रदीप पूर्णेकर हत्येचा कट हा महिनाभरापूर्वीच रचला होता अशी माहिती मिळत आहे. त्यासाठी हत्यारे पिस्तुल गाड्या यांची जमवाजमव करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीत एक दुचाकी २५ हजार रूपयांना खरेदी केली होती.

हत्यात वापरण्यात आलेल्या दुचाकी नंतर समतानगर इथं सोडून देण्यात आल्या होत्या. जप्त करण्यात आलेली दुचाकी ही एका महिलेच्या नावावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT