Pradeep Purnekar Case pudhari
ठाणे

Pradeep Purnekar Case: निखिल यादवला राजेंद्र शिंदेने बंदूक चालवायला शिकवलं? राम पूर्णेकरांचा गौप्यस्फोट

एवढे दिवस होऊनही पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. आम्ही पोलिसांना अनेक पुरावे दिले, तरीही पोलीस फक्त चौकशीचे नाटक करतात.

Anirudha Sankpal

Pradeep Purnekar Case: "माझ्या वडिलांची हत्या होऊन आज २२ दिवस उलटले आहेत. परंतु, एवढे दिवस होऊनही पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. आम्ही पोलिसांना अनेक पुरावे दिले, तरीही पोलीस फक्त चौकशीचे नाटक करत असून कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत," असा गंभीर आरोप प्रदीप पूर्णेकर हत्येतील पीडित मुलाने पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच राजेंद्र शिंदे यानेच निखिल यादवला बंदूक चालवायला शिकवलं असा दावा देखील राम पूर्णेकरने केला आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी करत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

राजेंद्र शिंदेनेच दिले बंदूक चालवायचे ट्रेनिंग

पत्रकार परिषदेत बोलताना राम पूर्णेकरने सांगितले की, "या हत्येमागे राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांचाच हात असून त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे." तिने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये राजेंद्र शिंदे आणि संतोष टल्ली यांचा एकत्र फोटो, तसेच राजेंद्र शिंदे निखिल यादवला बंदूक देतानाचा व बंदूक चालवायचे ट्रेनिंग देतानाचा व्हिडिओ समाविष्ट आहे. मुळशी येथील मूळ गावी हे सर्वजण बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात असल्याचा दावाही तिने केला.

पाचवा आरोपी राजा शिंदेच

त्याहून पुढे जात पूर्णेकर यांनी एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून एक मोठा खुलासा केला. "राजेंद्र शिंदे यांच्या फोटोला AI द्वारे हेल्मेट लावून पाहिले असता, हत्येच्या वेळी हल्ला करणारा पाचवा आरोपी अमित सिंग नसून तो 'राजा शिंदे'च असल्याचे स्पष्ट होते. नीळकंठ येथे राजेंद्र शिंदे यांच्या घराबाहेर एका प्रत्यक्षदर्शीने त्याला हेल्मेट घालताना पाहिले होते," असे ती म्हणाली. तसेच व्हिडिओत बॅग घेऊन नाचणारा 'कदम' नावाचा व्यक्ती त्यांच्या घराची रेकी करत होता, असाही आरोप राम पूर्णेकरने केला.

शिंदेंनी आश्वासन दिले होते

"यूपी एसटीएफ (UP STF) च्या तपासात नगरसेवक निवडणुकीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे, परंतु आमचे स्थानिक पोलीस गप्प आहेत. माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे. मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मला भेटल्यावर 'मी तुझ्या पाठीशी आहे' असे आश्वासन दिले होते; मला आता त्यांच्याकडूनच न्यायाची अपेक्षा आहे," असे सांगत पूर्णेकरणे प्रशासनाला न्यायाची आर्त साद घातली. "माझ्या जीवाला काही झाल्यास याला प्रशासनच जबाबदार असेल," असा इशाराही शेवटी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT