Pradeep Purnekar Case: टायगर श्रॉफला भेटणाऱ्या शिंदेंवर पूर्णेकरांच्या मुलाची टीका; म्हणाले,'हेच शिवसेना मीनाक्षी राजा पर्व'

Pradeep Purnekar Case: प्रदीप पुर्णेकर हत्येला १९ दिवस उलटूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट न घेतल्याने मुलाची नाराजी; सोशल मीडियावरील पोस्टमधून उपस्थित केले सवाल
Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar CasePudhari
Published on: 
Updated on: 

Pradeep Purnekar Son on Eknath Shinde

ठाणे : ठाण्यात प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येला १९ दिवस उलटूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याने कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याच्या घरी जाऊन सोमवारी (दि.१९) सकाळी भेट घेतली आणि त्याची विचारपूस केली. तसेच, या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मात्र, ठाण्यातच राहणाऱ्या प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वेळ न मिळाल्याबद्दल त्यांच्या मुलाने सोशल मीडियावरील पोस्टमधून नाराजी व्यक्त केली आहे.

Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Case | ‘पोलिसांनी त्यावेळीच तक्रारींचे निवारण केले असते, तर ही घटना घडली नसती’

प्रदीप पुर्णेकर यांच्या मुलाने केलेल्या पोस्टमध्ये टायगर श्रॉफच्या भेटीचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुर्णेकर यांच्या हत्येच्या घटनेला १९ दिवस उलटूनही संबंधित कुटुंबीयांची भेट न घेणारे उपमुख्यमंत्री, गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफची विचारपूस करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचतात आणि कठोर कारवाईचे आश्वासन देतात, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

"ठाण्यातील हत्येला १९ दिवस उलटल्यानंतरही कुटुंबीयांची भेट न घेणारे उपमुख्यमंत्री टायगर श्रॉफची विचारपूस करायला घरी पोहोचले आणि कठोर कारवाईचे आश्वासन दिले. ठाण्यात घराजवळ असलेल्या प्रदीप पुर्णेकर यांच्या भेटीला मात्र वेळ नाही. याला म्हणतात शिवसेना मीनाक्षी राजा पर्व," असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news