Pradeep Purnekar Case : टल्ली, पपलू यांच्या कोठडीत ३ दिवसांची वाढ

न्यायमूर्तींना दाखविलेल्या गोपनीय नोंदीचे रहस्य काय?
Jail
JailPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे : उबाठा मानपाडा विभाग प्रमुख स्व. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपी पैकी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंग उर्फ पपलू या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे सोमवारी त्यांना ठाणे सत्र न्यायालयात न्यायमूर्ती एस.बी.साबळे यांच्या दालनात एसआयटी टीमने हजार केले.

या प्रकरणात महत्वाची माहिती सापडलेली असून पोलिसांनी गोपनीय माहितीची नोंदवही न्यायमूर्तींना दाखविली. न्यायमूर्ती साबळे यांनी दोन्ही आरोपीना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान न्यायमूर्तींना दाखविण्यात आलेल्या गोपनीय नोंदीचे रहस्य वाढलेले आहे.

ठाणे सत्र न्यायालयात न्यायमूर्ती एस.बी. साबळे यांच्या दालनात ठाणे पोलिसांच्या एसआयटी टीमने आरोपी संतोष कनोजिया उर्फ टाळली आणि अमित सिंग उर्फ पपलू यांना हजर केल्यानंतर पोलिसांच्या वतीने न्यायालयात आरोपी हे तपासात सहकार्य करीत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.

Jail
Dombivli Crime : वरपमध्ये देवीच्या उत्सवात तलवारी, कोयत्यांचा थरार!

पोलिसांना अद्याप पर्यंत गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र आणि परिधान केलेले कपडे आणि हेल्मेटचा शोध घ्यायचा आहे. आरोपी तपासात उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा युक्तीवादही सरकारी वकिलांनी केला.

तपासात महत्त्वाची माहिती पुढे आल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, माहिती गोपनीय असल्याने ती उघड करता येणार नसल्याचे स्पष्ट करत पोलिस डायरीतील संबंधित नोंद न्यायाधीशांना वाचण्यासाठी देण्यात आली. या नोंदीत नेमकी कोणती माहिती आहे, त्यातून तपासाला कोणती दिशा मिळाली आणि अन्य कोणाचा उल्लेख आहे का, याबाबत स्पष्टता मिळू शकली नाही.

Jail
Tiger Shroff Firing Case : एस. व्‍ही. रोड, विले-पार्ले, अंधेरी मार्गे बोरिवलीहून कॅबने गाठले सुरत

अखेर न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. प्रयागराज येथून अटक केलेल्या आरोपी टल्ली, पपलू यांना स्थानिक न्यायालयात नेल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपींनी नगरसेवक पदावरून हत्या केल्याची कबुली दिली. युपीच्या न्यायालयात तशी नोंद असल्याचे वकिलांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांच्या गोपनीय नोंद वहीत नोंद आहे तरी काय ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

राजेंद्र शिंदे चौथ्यांदा चौकशीसाठी हजर

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने चौथ्यांदा चौकशीसाठी सकाळी ११ वाजता बोलावले होते. संध्याकाळपर्यंत राजेंद्र शिंदे याची चौकशी करण्यात आलेली आहे. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वाधिक जास्त चौकशी ठाणे खंडणी विरोधी पथकाने केलेली आहे. दरम्यान या हत्या प्रकरणात मृतकाच्या कुटुंबियांद्वारे राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत. ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी चौथ्यांदा चौकशीसाठी बोलावल्यानंतर पुन्हा बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news