पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 293 उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा बहुतांश प्रभागांमध्ये शांततेत पार पडला.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच 30 डिसेंबर रोजी तब्बल 400 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज निवडणूक अधिकाऱ्यांकडून सर्व अर्जांची छाननी करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक 19, 20 आणि 4 मधील काही उमेदवारी अर्जांवर हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. संबंधित हरकतींची तपासणी करून निर्णय घेण्यात आला असून उर्वरित प्रभागांमध्ये कोणताही वाद न होता छाननी सुरळीतपणे पार पडली.
दरम्यान, आर. ओ. 6 पनवेल अंतर्गत येणाऱ्या काही उमेदवारी अर्जांच्या बाबतीत अद्याप सुनावणीचा निर्णय प्रलंबित असल्याने त्या संदर्भातील अंतिम माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. संबंधित प्रकरणांवरील निर्णयानंतरच त्या प्रभागातील वैध उमेदवारांची अंतिम संख्या स्पष्ट होणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयी खाते उघडले आहे. भाजपचे प्रभाग 18 ब मधील उमेदवार नितीन जयराम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. विरुद्ध उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे ते बिनविरोध झाले आहेत. त्यांच्या विजयी सलामीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. त्यापूर्वी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु होती. 30 डिसेंबर 2025 हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. प्रभाग 18 ब जागेसाठी भाजपकडून नितीन पाटील आणि शेकाप आघाडीकडून रोहन गावंड यांनी ना.मागास प्रवर्गसाठी अर्ज दाखल होते. अर्जाची छाननी आज झाली. यामध्ये रोहन गावंड यांना जातपडताळणीच्या कागदपत्रांची योग्य पूर्तता न झाल्याने शेकापचे रोहन गावंड यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी पावन चांडक यांनी गावंड यांचा अर्ज बाद केला असल्याचे जाहीर केले.
1. प्रभाग समिती अ उपविभाग नावडे वार्ड क्रमांक 1,2,3 वैद्य उमेदवारी अर्ज 73
2. प्रभाग समिती खारघर वॉर्ड क्रमांक 4,5,6 वैद्य उमेदवारी अर्ज 43
3. प्रभाग समिती ब कळंबोली वॉर्ड क्रमांक 8,9,10 वैद्य उमेदवारी अर्ज 65
4. प्रभाग समिती क कामोठे वॉर्ड क्रमांक 11,12,13 वैद्य उमेदवारी अर्ज 64
5. प्रभाग समिती ड पनवेल 1 वॉर्ड क्रमांक 14,15,16 वैद्य उमेदवारी अर्ज 48
पनवेलमध्ये भाजपचे प्रभाग 18 ब मधील उमेदवार नितीन जयराम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. विरुद्ध उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे ते बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 19, 20 आणि 4 मधील काही उमेदवारी अर्जांवर हरकती