Bhiwandi Municipal Election: भिवंडीत घराणेशाही जोरात; आमदार-माजी खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी

भाजप, शिंदेसेना उमेदवार यादीत कुटुंबीयांचा भरणा; मदनबुवा नाईकांचा पत्ता कट
Shiv Sena BJP
Shiv Sena BJPPudhari
Published on
Updated on

भिवंडी : संजय भोईर

शहरात घराणेशाही जोरात असल्याचे चित्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिसले. भाजप आमदार महेश चौघुले यांनी त्यांचा मुलगा मित चौघुले याला प्रभाग 1 मधून भाजपतर्फे उमेदवारी जाहीर केली आहे.

Shiv Sena BJP
Bhiwandi POCSO Crime Case: नातेवाईक तरुणीवर दोघा भावांकडून सात वर्षे अत्याचार; भिवंडीत पोक्सोचा गुन्हा

तर माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे माजी नगरसेवक सुमित पाटील यांनी प्रभाग 17 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदेसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा भाऊ माजी नगरसेवक संजय म्हात्रे यांनी प्रभाग प्रभाग 13 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Shiv Sena BJP
Mumbai Development: तिसरी आणि चौथी मुंबई उभारणीचा केंद्रबिंदू ठाणे; विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात

आमदार खासदारांसह शहरातील माजी नगरसेवकांनी देखील आपल्या कुटुंबातील उमेदवारांना नेहमीप्रमाणे आपल्या प्रभागात उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतली आहे. शिंदे सेनेचे माजी उपमहापौर मनोज काटेकर व त्यांच्या पत्नी प्रभाग 21 मधून निवडणूक लढत आहेत. तर शिंदे सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांनी प्रभाग 13 मधून तर त्यांचा मुलगा रोहित चौधरी यांनी प्रभाग 15 मधून उमेदवारी मिळवली आहे.

Shiv Sena BJP
Hit and Run Thane | नेवाळी- मलंगगड रस्त्यावर मद्यपी वाहनचालकांचा कहर: पहाटे तीन वेगवेगळे अपघात, एकाचा मृत्यू

मदनबुवा नाईक यांचा पत्ता कट

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले शिंदेसेनेचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक मदनबुवा नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका गुलाबताई मदन नाईक व सून अस्मिता प्रभुदास नाईक असे एकाच कुटुंबातील तिघेजण नगरसेवक होते. पण यावेळी शिंदे सेनेने फक्त गुलाबताई मदन नाईक यांना उमेदवारी देत मदनबुवा व त्यांच्या सून अस्मिता यांना उमेदवारी नाकारली आहे. मदनबुवा हे मागील 40 वर्षांपासून पालिका सभागृहात आहेत. परंतु यावेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news