

शशिकांत सावंत :
राज्य सरकारने पनवेल बेलापूरला जोडून थेट अलिबाग रोह्यापर्यंत तिसरी मुंबई आणि शहापूर, मीरा-भाईंदर ते डहाणूपर्यंत चौथी मुंबई विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही विकसित होणाऱ्या मुंबईच्या विस्तार कक्षामुळे ठाणे जिल्हा विकासाच्या केंद्रस्थानी येणार आहे. साहजिकच या जिल्ह्याच्या विकासाला यामुळे नवी भरारी मिळणार आहे.
ठाणे जिल्हा हा ठाणे, कल्याण-डोंबिवली ०१ नवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी अशा सहा महापालिका एकाच जिल्ह्यात असलेला राज्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा आणि विस्तारलेला जिल्हा आहे, या जिल्ह्यात मुरबाड, सहापूरसारखे ग्रामीण तालुके ठे विकासाच्या वाटेवर गतिमानपणे पुढे जाणारे तालुके आहेत. भिवंडीचा हातमाग व्यवसाय, नवी मुंबईचे आंतराष्ट्रीय विमानतळ आणि बाढवणला जोडून समुद्राला जोडून उभे राहणारे विमानतळ, दिल्ली मुंबई कॉरिडॉर, अलिबाग-विरार कॉरिडॉर, चार मेट्रो आणि समृद्धीसारखा महामार्ग असे अनेक प्रकल्प या जिल्ह्याला जोडून उभे असल्याने त्याचा मोठा फावदा ठाणे जिल्ह्याला होणार आहे. लागे जिल्ह्याला पुरातन इतिहास आहे.
तानसा, भातसा अभयारण्य आणि या विल्ह्यात शहापूरमध्ये असलेले तानसा, भातसा, वैतरणा, बारवी, मोडकसागर अशा धरण प्रकल्पांमुळे या जिल्ह्याचे महत्व अधोरेखित झाले आहे. मुंबईला पाणी पुरवठा ठाणे जिल्ह्यातूनच होतो. त्यामुळे ठाणे आणि मुंबईचे नाते जीवाभावाचे आहे. या जिल्ह्यात घेऊ घातलेले नवे प्रकल्प आणि महामार्ग, बुलेट ट्रेन यामुळे ठाणे जिल्ह्याच्या विस्ताराला गती येऊ लागली आहे. मुरबाड, भिर्थडी रेल्वे प्रकल्पांबाबतही सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. येशील अभयारण्ये, पुरातन मंदिर आणि हेरिटेज वास्तुमुळे या जिल्ह्याला पर्यटनाचीही वेगळी ओळख मिळालेली आहे. संजय गांधी उद्यानही या जिल्ह्याला जोडून आहे. समृद्धी महामार्ग हा शहापूर पर्यंत सध्या थांबलेला आहे.
त्याचा विस्तार आता मुंबईपर्यंत होणार आहे. दिपी दिल्ली कॉरिडॉरचा काही भागही ठाणे जिल्ह्यात येतो. त्यामुळे औद्योगिकरणालाही गती मिळणार आहे. येथील ठाणे शहराची रिंग रोड रेल्वे, कासारवडवली ते वडाळा मेट्रो, भिवंडी-कल्याण तळोजा मेट्रो आणि दिल्ली-मुंबई होणाऱ्या एक्स्प्रेस-वे यामुळे या जिल्ह्यात विकासाची समृद्धी पाहायला मिळणार आहे. ठाणे जिल्ह्याला राजकीय बारसाती मोठा मिळाला आहे. राम कापसे, जगनाथ पाटील ते एकनाथ शिंदे राज्यात प्रभावी राहिल्याने ठाणे जिल्हा विकासाचा केंद्रबिंद राहिल्याचे पाहायला मिळत आहे. येथील वाढते शहरीकरण हा सध्याचा मोठा विषय आहे. लोकसंख्येची घनता बाढत असल्याने येथे पायाभूत सुविधा वाढवणे हा महत्वाचा प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे. त्यावर उपाय म्हणून रस्ते, मेट्रो, रेल्वे विस्तारीकरण अशा प्रकल्पाच्या कामाला गती मिळत आहे. या जिल्ह्यात आदिवासी बहुल तालुके ही विकासाच्या वाटेवर आघाडीवर आहेत.
ग्रामीण भागातून रोजगारासाठी येणारे नागरिक यामुळे दिवसागणिक लोकसंख्येत वाद होत आहे. परप्रांतीयांचे लोंढेही मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत. या सर्व समस्या एका बाजूने असल्या तरी काही संधीही तेवढ़धाच क्षमतेने पुढे येत आहेत. त्यामुळे राज्यात नव्या संधी अधिक असलेला जिल्हा माणूनही ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. उत्गे, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ, असे मोजकेच तालुके असलेल्या जिल्ह्यात ५९ सदस्य, पंचायत समितीचे १०२ सदस्य आणि महापालिकांमध्ये ठाण्यात १३१. कल्याण-डोंबिवलीत १२२, नवी मुंबईत १११, भिवंडीत ९०, उल्हासनगर ७० असे नगरसेवक या महापालिकांमधून निवडून येतात. १८ आमदार, ३ खासदार एकाच जिल्कातून निवडून येणारा राज्यातील ठाणे हा जिल्हा आहे. त्यामुळे मुंबई पाठोपाठ ठाण्याचे राजकीय महत्वही तेवढेच महत्वाचे ठरत आहे. ठाण्याचे एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.
राजकीय, सामाजिकदृष्ट्याही ठाण्याचे महत्व अधिक आहे. या जिल्ह्याने मराठी संस्कृती आणि मराठमोळेपणाचा बाज कायम ठेवला आहे. सांस्कृतिक नगरी म्हणूनही ठाणे जिल्ह्याला ओळखले जाते. एका बाजूला शहरीकरण तर दुसऱ्या बाजूला बदलापूरचे जांभूळ, वाडा कोलम, अशा भाताच्या जाती या राष्ट्रीय स्तरावरही सरस तरल्या आहेत. यांना राष्ट्रीय भौगोलिक मानांकनही मिळाले आहे. तानसा अभयारण्यातील नैसर्गिक समृद्धता आणि प्राणी संपदा हाही या जिल्ह्याची ओळख ठरत आहे. संजय गांधी उद्यान ते तुंगारेश्वरचे अभयारण्य हा भाग निसर्गप्रेमीचे आकर्षण आहे. इथली शेती समृद्धी, इथल्या शहरांची असणारी नवी ओळख, आशियातील सर्वात मोठ्या नवी मुंबई विमानतळामुळे मिळालेली जागतिक ओळख अशी अनेक नवीन वैशिष्ट्ये या जिल्ह्याला लाभली आहेत. एका बाजूला डोंगररांगा, दुसऱ्या
बाजूला लाभलेली विशाल खाडीकिनारे, रामसरचा दर्जा मिळालेले पलेमिंगो अभयारण्य असा अनेक व्यात समृद्धीचा एकत्रित संगम या जिल्ह्यात आहे. ठाणे शहराला ठान्हा' असे प्राचीन नाव होते. याबाबतचा उल्लेख मध्ययुगीन शिलालेखात आणि ताम्रपटातही सापडतो. त्यामुळे या शहराचा सांस्कृतिक ठेवा जुन्या संस्कृतीशी नाळ जोडणारा आहे. मराठी, उत्तर भारतीय, सिंधी, गुजराती, दक्षिण भारतीय, मुस्लीम आणि मारवाडी असे अनेक जाती धर्माचे लोक उद्योगधंद्याच्या निमित्ताने येथे आले आहेत. साहजिकच औद्योगिक दृष्टीकोनातून एक विशाल जिल्हा म्हणून याकडे पाहिले जाते. मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात या भागात शिलाहार राजाचे राज्य होते आणि ठाणे हेच त्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. ठाणे हे पूर्वी मोठे बंदर होते. आता समृद्ध शहर म्हणून याची ओळख झाली आहे. पोर्तुगीज ठाण्यात १५ ते ३० मध्ये आले. त्यानंतर ते २०० वर्षे राहिले. नंतर मराठ्यांनी या शहराचा ताबा मिळवला.
नंतर इंघजांनी येथे आपले प्रस्थान बसवले, अशा नोंदी येथे सापडतात. या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी मानली जाते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी अशा आणि मराठी नववर्ष स्वागत दिंड्या, असे अनेक सण येथे मोठ्या उत्साहाने येथे साजरे होतात. ठाणे शहरातील गडकरी रंगायतन सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर आहे. येथील राम मारुती रस्ता, गोखले रस्ता हे व्यापाराचे केंद्र आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरांना आपापली अशी वेगळी ओळख आहे. चित्रपट, नाटघ क्षेत्रातील नामवंत कलाकार या शहराने दिले आहेत. यामध्ये सुहास जोशी, उमेश कामत, कविता लाड, प्रिया मराठे, ऋता दुर्गुळे, अशी अनेक नावे ठाणे जिल्ह्याशी जोडलेली आहेत. डॉचिवलीची स्वागतयात्रा महाराष्ट्राचे आकर्षण आहे. या जिल्ह्याची प्रत्येक क्षेत्रात गरुडझेप पाहायला मिळते. शिक्षण क्षेत्रातही या शहराची भरारी वाखाणण्याजोगी आहे. येथे शिक्षणसंस्थांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.