Mumbai Local Train Update Pudhari
ठाणे

Conversion Allegation: मुंबई लोकल बनतेय धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा

मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा; अन्यथा जनआंदोलन

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: पनवेल-सीएसएमटी मार्गावरील 'एसी' लोकल सह अन्य गाड्यांमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून चालवली जाणारी छूपी 'धर्मांतर मोहीम' सुरू असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

या प्रकारांची गंभीर दखल घेत हिंदु जनजागृती समितीने राज्याचे पोलीस महासंचालक, गृह विभाग आणि मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांना सविस्तर निवेदन पाठवले आहे. यामागील मुख्य सूत्रधारांवर आणि जाहिराती छापणाऱ्या मुद्रणालयांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी समितीने केली असून १५ दिवसांत ठोस पावले न उचलल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

भावनिक मथळ्यांची पत्रके डब्यांत लावून नैराश्यग्रस्त किंवा अडचणीत असलेल्या प्रवाशांचे पद्धतशीरपणे 'ब्रेनवॉश' केले जात आहे. रेल्वेसारख्या सार्वजनिक मालमत्तेचा असा उघड गैरवापर अत्यंत संतापजनक असल्याचे हिंदु जनजागृती समितीने निवेदनात म्हटले आहे.

या धर्मांतर मोहिमेसोबतच लोकलच्या डब्यांमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. केवळ प्रार्थनेने कॅन्सरसारखे अनेक गंभीर आजार बरे करण्याचे अशास्त्रीय दावे केले जात आहेत.

याशिवाय '१००% वशीकरण' आणि 'प्रेम प्रकरण नीट करून देणारे बंगाली बाबा' अशा फसव्या जाहिरातींमुळे प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे.

हेल्पलाइन सुरू करावी

प्रवाशांना तातडीने तक्रार करता यावी यासाठी रेल्वेने 'व्हॉट्सॲप हेल्पलाइन' सुरू करावी. रेल्वेचे साध्या वेशातील विशेष पथके नेमून या समाजकंटकांना रंगेहाथ पकडावे; तसेच जाहिरातींवरील फोन नंबर आणि वेबसाइटचा सायबर पोलिसांमार्फत सखोल तपास करून यामागे असलेल्या संस्था आणि भोंदूबाबांवर थेट गुन्हा दाखल करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT