मुरबाड : तालुक्यात कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गासह, नदिनाल्यालगत मोठ्या प्रमाणात विटभट्ट्या सुरु आहेत. यासाठी लागणारे पाणी पाटबंधारे विभागाचे नियंत्रण असलेल्या नदी नाल्यातून विना परवाना उचलले जात असल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मुरबाड पाटबंधारे विभागात पूर्णवेळ उप अभियंता नसल्याने या लोकांचे फावल्याचा आरोप होत आहे.
तालुक्यातील काळु, शाई, कनकविरा, डोईफोडी, मुरबाडी, बारवी या नद्यांसह अनेक लहान मोठे नाले नदीलगत सध्या विट भट्ट्यांचे पेव फुटले आहे. तर कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लाखो लिटर पाणी दररोज उचलले जात असतांना पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत असून, शासनाचे आर्थिक नुकसान करणाऱ्यावर व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत माहीती घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याबाबत सांगीतले जाईल.सुनील दांडकर, उप अभियंता, पाटबंधारे, उप विभाग, मुरबाड