ठाणे

मुंबई : सप्तश्रृंगी बस अपघातात मृत्‍युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे १० लाख रूपयांची मदत

निलेश पोतदार

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एसटी बसच्या अपघातात एका महिलेचा दुर्देवी मृत्‍यू झाला. या मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज (बुधवार) सकाळी खामगावच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झाले आहे.

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT