Digital Arrest Scam Pudhari
ठाणे

Digital Arrest Scam : डिजिटल अरेस्टचा धाक दाखवत ज्येष्ठाला १५ लाखांचा गंडा

काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : मिरा रोडमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून सायबर भामट्यांनी ६७ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १४ लाख ७७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

एमआयडीसी रोडवरील रॉयल पार्क परिसरात राहणारे सुभाष शंकर सुतार यांना आरोपींनी स्वतःला पोलीस व आयपीएस अधिकारी असल्याचे भासवत फोन केला. त्यांच्या नावाने दोन कोटी रुपये परदेशात पाठवण्यात आल्याचा खोटा आरोप करत अटक व कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली. तसेच अंमलबजावणी संचालनालयाच्या नावाने बनावट नोटीस पाठवून त्यांना घाबरविण्यात आले.

अटकेच्या भीतीने घाबरलेल्या सुतार यांनी आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर आरटीजीएसद्वारे १४.७७ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘डिजिटल अरेस्ट’ ही संकल्पनाच कायद्यात अस्तित्वात नाही. सरकारी यंत्रणा किंवा पोलीस फोनवरून पैसे मागत नाहीत. अशा फोन, नोटिसा, धमक्यांवर विश्वास न ठेवता पोलिसांशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT