Mira Road ATS case Pudhari
ठाणे

Mira Road ATS case:अन्सारीच्या पोलीस कोठडीत 11 मेपर्यंत वाढ

मोबाईल, लॅपटॉप केला फॉरमॅट, तपास यंत्रणांचा कस पणाला

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: अमेरिकेच्या वुल्फ अटॅकची पार्श्वभूमी असलेल्या मिरारोड वादग्रस्त प्रकरणातील आरोपी झबी जुबेर अन्सारी याला सोमवारी दुपारी ठाणे न्यायालयात पोलीस कोठडी संपल्यामुळे हजर करण्यात आले. सरकारी वकील संजय मोरे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने अन्सारी याला 11 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मिरारोड येथील प्रकरणात एटीएस पथकाने अटक केलेल्या झैब जुबेर अन्सारी याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून हस्तगत केलेल्या लॅपटॉप आणि मोबाईल यांची तपासणी केल्यानंतर मोबाईल फॉरमॅट केलेला असल्याने कुठलीच ठोस माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस कोठडी मुदत संपल्याने सोमवारी अन्सारी याला ठाणे एटीएस पथकाने ठाणे विशेष न्यायालयात हजर केले.

न्यायालयात सरकारी वकील मोरे यांनी न्यायालयात एटीएस पथकाची बाजू मांडत पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयात मोरे यांनी सांगितले. एटीएस पथकाला अधिक तपास करायचा आहे. आरोपी अन्सारी याने काही व्हॉइस कॉल केलेले होते. मात्र त्याने मोबाईल फॉरमॅट केल्यामुळे एटीएस पथकाच्या हाताला काहीच लागलेले नाही. झैब जुबेर अन्सारी हा ऑनलाईनद्वारे अमेरिकेत ट्युशन घेत असल्याची माहिती एटीएस पथकाला उपलब्ध झालेली असून त्याबाबत तपास करायचा असल्याचा युक्तीवाद करण्यात आला.

वैद्यकीय तपासणीची मागणी

सोमवारी दुपारी ठाणे विशेष न्यायालयात एटीएस पथकाने हजर केलेला आरोपी झैब जुबेर अन्सारी याला ठाणे विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस.शिंदे यांनी तुला पोलिसांकडून त्रास झालाय काय? अशी विचारणा केल्यानंतर आरोपी अन्सारी याने नाही म्हणून सांगितले.

दरम्यान, अन्सारी याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले कि, त्याला आजार असून पोटाच्या विकाराने त्रस्त आहे. तेव्हा त्याची वैद्यकीय तपासणी करावी अशी विनंती करताच न्यायमूर्ती एस.एस.शिंदे यांनी एटीएस पथकाला अन्सारी याच्या वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया काय आहे ती बघून घ्या, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT