

भिवंडी: शहरात एक धक्कादायक गुन्हेगारीची भीतीदायक घटना समोर आली असून गुरुवारी उशिरा रात्री एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. कमरूजमा मोहम्मद शब्बीर शेख असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,न्यू आजादनगर येथील कमरूजमा मोहम्मद शब्बीर शेख (38) हे 30 एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे 1.30 वाजता काम उरकून दुचाकीवरून आपल्या घरी जात होते .त्यावेळी एक हॉटेलसमोर पाच जणांच्या टोळक्याने त्यांना अडवले.
बोरिंगचे सामान चोरी केल्याच्या संशया वरून आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात शेख यांचे दोन्ही हात पाय फ्रॅक्चर झाले असून गंभीर दुखापत झाली आहे.
त्यांना तत्काळ मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात कबरूद्दीन सिद्दीकी,अफसार सिद्दीकी,इमरान अन्सारी, शहनवाज सिद्दीकी आणि आलम शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.