डोंबिवली : कल्याणमध्ये एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर पाच महिन्यांपासून सात नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील सात जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आठ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही अल्पवयीन मुलगी आपल्या आईबरोबर राहते. या मुलीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून राहुल भोईर याच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर राहूलने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ त्याने त्याचा मित्र देवा पाटील याला पाठवला. त्यानंतर देवा पाटील याने त्या मुलीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे आणि किरण सुरवसे यांना पाठवला. या नराधमांनीही तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
या सर्व नराधमांकडून व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर गेल्या पाच महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. हे सगळे आरोपी मुरबाड आणि भिवंडी परिसरात राहणारे असून धनाढ्य कुटुंबातील आहेत. या घटनेमुळे ती मुलगी मानसिक तणावात गेली होती. पिडीत मुलीचा व्हिडिओ कुटुंबियांपर्यत पोचल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या सात नराधमांना अटक केली. या सात जणांना कल्याणच्या पोस्को विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
चौकशी दरम्यान आणखी एक धक्कादायक बाबही समोर आली आहे. सामूहिक अत्याचारांतून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. सततच्या त्रासामुळे ती मानसिक तणावाखाली होती, पण ती घरच्यांना तिने काहीच सांगितले नाही. तिचा व्हिडीओ इतका व्हायरल झाली की तो थेट तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर तिच्या घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी थेट कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेत नराधमांविरोधात तक्रार दाखल केली. एप्रिल महिन्यापासून पीडित मुलीवर आत्याचार सुरू होते.