Mumbai Rain Pudhari
ठाणे

Cyclone weather update: उकाड्यानंतर पावसाचा दिलासा! पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज

मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाच्या सरी; महाराष्ट्रातील काही भागातही पाऊस

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा: शुक्रवारी सकाळीच मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरींचा अनुभव सर्वांनाच अनुभवता आला. उष्‍णतेने लाही लाही होत असतानाच हा अनुभव आला. अर्णव चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूूमीवर या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

राज्यात यंदा पावसाने लवकर पाठ फिरवली असतानाच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर निर्माण झाली. त्यामुळे या आता मोठा दिलासा मिळाला. राज्यात शुक्रवारी पडलेल्या पावसाला सुरुवात झाली.

इतकेच नाही तर पुढील काही दिवस राज्यात पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे.भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. देशातील अनेक भागात पाऊस कोसळणार आहे. चक्रावती अर्णव‍ चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक राज्यात धो धो पाऊस पडत असून महाराष्ट्रातील काही भागातही पाऊस पडत आहे.

मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू आहे. पावसासोबतच ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, ओडिसा, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये अतिमुसळधार पाऊस होईल. पुढच्या २४ ते ४८ तासात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्‍यात आला आहे.

राज्यातही या चक्रीवादळाचा परिणाम दिसत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. आता पुन्हा पाऊस राज्यातील अनेक भागात कोसळत आहे, त्यामुळे मोठा दिलासा मिळताना दिसतोय. ओडिसा आणि छत्तीसगढ अर्णव चक्रीवादळाचा फटका बसताना दिसत आहे.

दरम्यान ३१ ऑक्टोबरपर्यंत या चक्रीवादाळाचा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या खाडीत कायम राहणार आहे. अरबी समद्रात चक्रीवादळामुळे मोठे संकट आले असून हिमाचल प्रदेशमध्येही या वाऱ्याचा फटका बसताना दिसणार आहे. अर्णव चक्रीवादळामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा उकाड्यापासून मिळाला. मागच्या काही दिवसांपासून वातावरणात गारठा जाणवत आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशीही राज्यात पाऊस कायम राहणार आहे.चक्रीवादळामुळे कोकण, घाटमाथा, आणि पूर्व विदर्भासह राज्यातील अनेक भागात पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात ३० ते ४० किमी वेगाने वारेही वाहतील. ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याच अंदाज आहे. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोदिंया, वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात पुढच्या पाच दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले.

पुढील काही दिवस पावसाचा अंदाज

पश्चिम बंगालच्या खाडीत सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले. या चक्रीवादळामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्यात पुढील काही दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे. अनेक राज्यात या वादळामुळे मोठे नुकसान झाले. पुढील काही दिवसात हे वादळ अजून तीव्र होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग विभागाकडून या वादळाबाबत सतत अलर्टचा इशारा दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT