राज्यातील 44 शासकीय ग्रंथालयांतील 41 लाख पुस्तके आता एका क्लिकवर pudhari photo
ठाणे

Digital library : राज्यातील 44 शासकीय ग्रंथालयांतील 41 लाख पुस्तके आता एका क्लिकवर

वाचन संस्कृतीला बळ, 36 हजार सभासद घेतायेत लाभ

पुढारी वृत्तसेवा

ठाणे ः अनुपमा गुंडे

राज्यातील 44 शासकीय ग्रंथालयांतील सुमारे 41 लाख पुस्तकांची माहिती ग्रंथालय आज्ञावली या प्रणालीमार्फत एका क्लिकवर उपलब्ध झाल्याने वाचनसंस्कृतीला बळ मिळते आहे.

या प्रणालीमुळे राज्यातील कोणत्या शासकीय ग्रंथालयात कोणते पुस्तक उपलब्ध आहे, ही माहिती या प्रणालीमुळे मिळत आहे. शिवाय दोन वर्षासाठी केवळ 100 रूपये वर्गणी शुल्कात ही पुस्तके वाचनासाठी मिळत असल्याने सुमारे 36 हजार सभासदांनी या पुस्तकांच्या वाचनांचा लाभ घेतला असून दिवसागणिक वाचकांची संख्या वाढत आहे.

राष्ट्रीय सूचना केंद्राच्या ई ग्रंथालय धोरणातंर्गत राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने शासकीय ग्रंथालयांमधील पुस्तकांची माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, 6 शासकीय मध्यवर्ती ग्रंथालये, दापोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय यांच्यासह प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले शासकीय ग्रंथालय अशी 44 ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांमध्ये विविध विषयांवरील सुमारे 41 लाख पुस्तके आहेत.

या पुस्तकांची नावे,खकाचे नाव, प्रकाशक, पुस्तकाची किंमत अशी माहिती ग्रंथालय आज्ञावली प्रणालीत नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय ग्रंथालयांच सभासद असलेल्या वाचकांनी , या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर ग्रंथशोध वर क्लिक केल्यानंतर त्यांना पुस्तकांची माहिती उपलब्ध होते.

ग्रंथालय आज्ञावली मध्ये राज्याच्या शासकीय ग्रंथालयातील पुस्तकांची माहिती संकलित करण्यात आली आहे. शासकीय ग्रंथालयातील सर्व साहित्य प्रकारातील, धार्मिक, पाककला, वास्तुशास्त्र, स्पर्धा परिक्षा, नाटक, कथा,कांदबर्या अशी सर्व पुस्तके आहेत, ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे, शिवाय या ग्रंथालयांमध्ये 100 रूपयांच्या वर्गणीत दोन वर्षात ही पुस्तके वाचण्यासाठी मिळत असल्याने सभासदांची संख्या वाढते आहे.
अशोक गाडेकर, संचालक, ग्रंथालय संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT