Government protocol for MPs and MLAs : खासदार, आमदारांचा सन्मान राखा, अन्यथा कारवाई

राज्य सरकारच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना; नवीन आदेश जारी
Government protocol for MPs and MLAs
खासदार, आमदारांचा सन्मान राखा, अन्यथा कारवाईfile photo
Published on
Updated on

मुंबई : खासदार आणि आमदारांशी सर्व सरकारी, निमसरकारी तसेच महामंडळांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागावे आणि त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी म्हणून नवीन आदेश काढला आहे. त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे पालन केले नाहीतर त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

राज्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लोकप्रतिनिधींशी उडणारे खटके, वादावादी काही नवीन नाही. माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि अन्य आमदारांनी अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीचे किस्से राज्यात गाजले होते. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आम्हाला सन्मानाची वागणूक देत नाहीत, आमच्यासाठी असलेला शिष्टाचार पाळत नाहीत अशी ओरड सातत्याने आमदारांकडून होत आली आहे.

Government protocol for MPs and MLAs
Mumbai Metro 9 : डिसेंबरअखेर सुरू होणार मेट्रो-9

यावरून प्रत्येक अधिवेशनात हक्कभंगाची प्रकरणे सभागृहात मांडली जातात. आता हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकारने खासदार, आमदारांच्या शिष्टाचाराबाबत नवीन आदेश जारी केला आहे. या आदेशाचे पालन करणे सरकारी, निमसरकारी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सक्तीचे करण्यात आले आहे.

विधानमंडळ सदस्य किंवा संसद सदस्य कार्यालयास भेट देतील त्यावेळी त्यांना संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी आदराची व सौजन्याची वागणूक द्यावी, त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकावे व प्रासंगिक शासकीय नियम व प्रक्रियेनुसार शक्य तेवढी तत्काळ मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ते भेटावयास येतेवेळी व भेट संपून परत जातेवेळी अधिकाऱ्यांना त्यांना अभिवादन करावे लागेल. फोनवर बोलताना नेहमी आदरयुक्त भाषा व शिष्टाचार पाळावा, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Government protocol for MPs and MLAs
High Court : कुणी एकटा फ्लॅटमालक पुनर्विकास रोखू शकत नाही
  • खासदार व आमदारांच्या पत्रांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त दोन महिन्यांच्या आत नियमानुसार सत्वर कार्यवाही करून अंतिम उत्तर द्यावे लागणार आहे. सदर निर्देश बदली, पदोन्नती यासारखे विषय वगळून अन्य विषयांच्या बाबतीत सर्व यंत्रणावर लागू करण्यात आले आहेत.

  • जर दोन महिन्यांत अंतिम उत्तर देणे शक्य नसेल तर मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील संबंधित अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय अधिकारी कार्यालय प्रमुखांनी ही बाब प्रशासकीय विभागाचे प्रमुख, विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांच्या नजरेस आणून त्याबाबत लेखी माहिती खासदार आणि आमदारांना द्यावी लागेल.

  • आमदार, खासदारांना द्यावयाच्या सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news