KDMT Electric Buses Pudhari
ठाणे

KDMT Electric Buses: केडीएमटीच्या ताफ्यात १० बस दाखल; कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रिक बस

महिनाअखेर चार्जिंग स्टेशन कार्यान्वित

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून २०७ इलेक्ट्रीक बसेस मंजूर झाल्या आहेत. यातील १० बसेस महापालिकेच्या परिवहन उपक्रम ताफ्यात दाखल झाल्या आहे.

या बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. हे स्टेशन उभारण्याचे काम येत्या महिन्या अखेर पूर्ण झाल्यानंतर या बसेस रस्त्यावर धावणार असल्याची माहिती केडीएमटीकडून देण्यात आली.

प्रदूषण कमी करण्यासह पर्यावरण संवर्धनाचा विचार करून केंद्र शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना इंधनावर धावणाऱ्या बसेसची संख्या हळूहळू कमी करून विद्युत यंत्रणेवर धावणाऱ्या बस सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

यातील १० बसेस दिवाळीपूर्वीच दाखल झाल्या असून या बसेस वसंत व्हॅली येथे उभ्या आहेत. उर्वरित पहिल्या टप्प्यातील बसेस मार्च अखेरपर्यंत आणल्या जाणार आहेत. चार्जींग स्टेशन उभारण्याचे काम सुरू असून ते कार्यान्वित झाल्यानंतर बसेस रस्त्यावर उतरविण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT