KDMC Election Pudhari
ठाणे

KDMC Election: प्रभाग समित्यांवर सेना-मनसे शिवशक्ती गटाचे वर्चस्व

केडीएमसीच्या दहा प्रभाग समित्यांवर शिंदे सेनेचे पाच, भाजपाचे चार व मनसेचे एक सभापती

पुढारी वृत्तसेवा

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या दहा प्रभाग समित्यांच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी चार प्रभाग सभापतीच्या बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित सहा प्रभाग समिती सभापती पदासाठी बुधवारी पार पडलेल्या

निवडणुकीतही बिनविरोध निवड झाल्याने दहा प्रभाग समितीवर शिंदे सेनेचे पाच, भाजपाचे चार व मनसेचे एक असे दहा प्रभाग समिती सभापती निवड झाल्याचे निवडणूक निर्णयक अधिकारी यांनी घोषित केले.

केडीएमसीच्या दहा प्रभागातील अ प्रभागात शिवसेनेचा, ड प्रभागात मनसेचा, फ प्रभागात भाजपचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने तिन्ही प्रभागात बिनविरोध निवड निश्चित होती.

तर उर्वरित सात प्रभागांसाठी बुधवारी निवडणूक निर्णायक अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका पार पडल्या. क प्रभाग क्षेत्रामध्ये भाजपकडून मेघाली खेमा शिवसेनेकडून प्रतीक पेनकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रमीज मणियार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

निवडणुकीदरम्यान प्रतीक पेणकर आणि रमिज मणियार यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने भाजपच्या मेघाली खेमा या बिनविरोध निवडून आल्या. ह प्रभाग निवडणुकीसाठी भाजपकडून रवीना म्हात्रे मनसे कडून संदेश पाटील शिवसेनेकडून रेखा म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

निवडणुकीदरम्यान संदेश पाटील आणि रेखा म्हात्रे यांनी माघार घेतल्याने भाजपचे रवीना म्हात्रे या बिनविरोध निवडून आल्या. ग प्रभाग निवडणुकीसाठी भाजपकडून कविता म्हात्रे शिवसेनेकडून सुरज मराठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामधील भाजपकडून कविता म्हात्रे यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे सुरज मराठे यांची बिनविरोध निवड झाली.

इ प्रभाग सभापती पदासाठी भाजपकडून रवीना माळी शिवसेनेकडून अर्जुन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता रवीना माळी यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने शिवसेनेचे अर्जुन पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

शिवसेना उबाठाकडून ब प्रभाग आणि आय प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र दोन्ही ठिकाणी उबाठा च्या उमेदवारांचा पराभव झाला व प्रभागात शिवसेनेचे सभापती विराजमान झाले तर आय प्रभागात भाजपचा सभापती विराजमान झाला.

विजयी झालेले उमेदवार

  • अ प्रभाग बंदेश जाधव-शिवसेना

  • ब प्रभाग सुप्रिया भोईर-शिवसेना

  • क प्रभाग मेघाली खेमा - भाजपा

  • जे प्रभाग दर्शना काळे-शिवसेना

  • ड प्रभाग शीतल मंढारी - मनसे

  • फ प्रभाग मंदा पाटील - भाजपा

  • ह प्रभाग रवीना म्हात्रे - भाजपा

  • ग प्रभाग - सूरज मराठे शिवसेना

  • आय प्रभाग - सरोज राय भाजपा

  • इ प्रभाग-अर्जुन पाटील शिवसेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT