Kalyan Vaccination Awareness Campaign Pudhari
ठाणे

Kalyan Vaccination Awareness Campaign: कल्याण पश्चिम रामबागेत ‘लस कल्याणाची’ जनजागृती मोहीम; लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ

ZMQ NGO आणि दैनिक पुढारी यांचा संयुक्त उपक्रम; गैरसमज दूर करून पालकांना वेळेवर लसीकरणासाठी प्रोत्साहन

पुढारी वृत्तसेवा

सापाड : योगेश गोडे

बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेवर लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून, याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या ‌‘लस कल्याणाची‌’ या समुदायाधारित लसीकरण उपक्रमांतर्गत कल्याण पश्चिम रामबाग परिसरातील जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम झेड.एम.क्यू. एनजीओ आणि पुढारी वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत लसीकरण पोहचले पाहिजे या उद्देशाने हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

लसीकरण जनजागृती मोहिमेअंतर्गत लसीकरणाविषयी माहिती आणि नियमित लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. लसीकरणाविषयी समाजात पूर्वापार चालत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी लस कल्याणाची उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरणाचे महत्त्व पटवून देत लसीकरणाची माहिती देण्यात आली. तर लसीकरण मोहिमेतून आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलांचे वेळेवर लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित देखील करण्यात आले. याशिवाय नागरिकांना ‌‘लस कल्याणाची‌’ व्हॉट्सॲप चॅनेलशी जोडून लसीकरणासंबंधी नियमित माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विशेष भर देण्यात आला.

लसीकरण जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाची सुरुवात झेड.एम.क्यू. एनजीओ विभागाच्या शोभा यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची माहिती दिली. विशेष म्हणजे ‌‘लस कल्याणाची‌’ उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे उपस्थितांसमोर मांडून आत्तापर्यंत झालेल्या सर्व उपक्रमांची माहिती दिली. तर झेड.एम.क्यू. एनजीओ डिपार्टमेंटचे रहिम खान यांनी देखील कल्याणाची उपक्रमाची माहिती देत लसीकरणाविषयी जनजागृती मेहिमेतून आतापर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा सादर केला. लसीकरण जनजागृती मोहिमेतील महत्वाचे प्रतिनिधी केडीएमसी आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक रहिवाशांच्या सहकार्यामुळे लस कल्याणाची जनजागृती मोहीम सातत्याने पुढे जात असल्याने लसीकरणाविषय योग्य माहिती जनतेपर्यंत पोहचत असल्यामुळे अनेक पालकांच्या मनातील गैरसमज दूर होऊन आपल्या पाल्याला लस कल्याणाची उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरण सुरू केले आहे. तर जनजागृती मोहिमेअंतर्गत कोड स्कॅन करून व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही रहीम खान यांनी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले. रहीम खान त्यांनी सहभागी कोल्सची ओळख करून देत कोल्सचे अनुभव आणि काम करण्याच्या पद्धतीविषयी माहिती दिली.

या उपक्रमाअंतर्गत आयोजित लसीकरण जनजागृती मोहिमेच्या कार्यक्रमात कोल्स फरिदा शरीफ आणि कोल्स ज्योती या दोघींनीही लस कल्याणाची उपक्रमाअंतर्गत आयोजित लसीकरण जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. कोल्स फरिदा शरीफ यांनी ‌‘लस कल्याणाची‌’ गटात सहभागी झाल्यानंतर लसीकरणाबाबत मिळालेली माहिती अधिक स्पष्ट झाल्याचे सांगितले. यापूर्वी लसीकरणाचे महत्त्व पूर्णपणे माहीत नसल्यामुळे जनजागृती करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले. मात्र लस कल्याणाची गटामधून अनुभवी प्रशिक्षकांकडून मिळालेल्या माहितीतून आपले ज्ञान अधिक वाढल्याचे सांगत व्हॉट्स ॲप ग्रुप मधून ते अधिकच घट्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

फरीदाने आपल्या परिसरातील एका कुटुंबाचे उदाहरण देत सांगितले की, सुरुवातीला लसीकरणास नकार देणारे हे कुटुंब सातत्यपूर्ण माहितीच्या जोरावर आपल्या बालकाचे लसीकरण पूर्ण करण्यास तयार झाले. त्यामुळे लसीकरणाविषयी जनजागृतीतून समाजपातळीवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. तर ज्योती यांनी देखील आपल्या अनुभवातून लसीकरणासंबंधी माहिती देताना लहान मुलांच्या मातांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान स्वीकारले. वेळेवर लसीकरणामुळे बालकांचे आरोग्य सुरक्षित राहते, हा संदेश देत ज्योती यांनी सातत्याने लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. फरिदा शरीफ आणि ज्योती यांनी लसीकरणाविषयी ‌‘कल्पना विरुद्ध वास्तव‌’ विषयावर प्रश्न उत्तरांचा टाक्स सोबत लसीकरणाची जनजागृती करत काल्पनिक गैरसमजावर पडदा घालण्याचे काम केले. त्याचबरोबर समाजातील लसीकरणावर आधारित प्रश्नमंजुषद्वारे उपस्थितांचा सहभाग वाढवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT