डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एका खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लू अर्थात H1N1 चे दोन रुग्ण आढळून आले होते. केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. संबंधित दोन्ही रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या ते वैद्यकीय सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत आहेत.
या संदर्भात बोलताना वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले की, स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार आहे. बाधित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेंबांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो. या आजारात प्रामुख्याने तीव्र ताप, खोकला, सर्दी, घसा दुखणे, अंगदुखी आणि अशक्तपणा अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतःहून कोणतेही औषध न घेता त्वरित महानगर-पालिकेच्या कल्याणातील रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवलीतील शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय तसेच महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रे व आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी व उपचार करून घ्यावेत. स्वाईन फ्लूपासून बचावासाठी नागरिकांनी काही आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये वारंवार साबण व स्वच् पाण्याने हात धुणे, खोकताना किंवा शिंकता रूमाल किंवा टिश्यूचा वापर करणे, संतुलित पौष्टिक आहार घेणे, भरपूर पाणी पिऊन शरीरा पुरेशा प्रमाणात द्रव ठेवणे, गर्दीच्या ठिकाण मास्कचा वापर करणे आणि आजारी असल्या अनावश्यक बाहेर न पडणे यांचा समावेश आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच् आरोग्य विभागामार्फत स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीव सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजन राबविण्यात येत आहेत. सध्या संपूर्ण परिस्थि नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून न जाता योग ती काळजी घ्यावी, असेही आरोग्य विभागाने स्प केले आहे. महापालिकेने सर्व नागरिकांना पुन् एकदा आवाहन केले आहे की, अशा प्रकारच लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या महापालिक रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकी आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांन केले आहे.