Palghar Police Raid | वाणगाव फाटकातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; तिघांना अटक

रोख रक्कम व पत्ते जप्त; मुख्य सूत्रधारासह संपूर्ण जाळ्याच्या चौकशीची ग्रामस्थांची मागणी
Police Gambling  Raid
Police RaidAI Photo
Published on
Updated on

Dahanu Vangaon Phata Gambling Den

कासा : डहाणू तालुक्यातील वाणगाव फाटक परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर वाणगाव पोलिसांनी सोमवारी (दि. ३) रात्री छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि पत्त्यांचे संच जप्त करण्यात आले असून, संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, १९८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास वाणगाव फाटकाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत रमाकांत शेट्टी, सुदाम गोलीम आणि आशिष दुबळा यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोख रक्कम तसेच पत्त्यांचे संच जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश भरभरे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, १९८७ च्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास वाणगाव पोलीस करीत आहेत.

Police Gambling  Raid
Palghar Crime News: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

दरम्यान, रमाकांत शेट्टी याच्याकडून परिसरात दीर्घकाळापासून अवैध जुगाराचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. यापूर्वीही अनेकदा तक्रारी करूनही अपेक्षित कठोर कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ग्रामस्थांनी पोलिसांकडे केवळ जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई न करता, अड्ड्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, जागा उपलब्ध करून देणारे कोण आहेत आणि या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Police Gambling  Raid
Palghar Crime : ६.७२ कोटींच्या घोटाळ्यात भूमापकाचा जामीन फेटाळला

स्थानिक नागरिकांच्या मते, वाणगाव परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांमुळे तरुण पिढी आणि अनेक कुटुंबांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे अशा अड्ड्यांवर सातत्याने धडक कारवाई करून अवैध जुगाराच्या मुळावर घाव घालावा आणि आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या कारवाईनंतर या अवैध जुगार व्यवसायामागे केवळ अटक करण्यात आलेल्या तिघांचाच सहभाग आहे की त्यामागे मोठे जाळे कार्यरत आहे, याचा तपास काय निष्पन्न करतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news