Jyeshtha Gauri Puja Pudhari
ठाणे

Jyeshtha Gauri Puja: आज लाडक्या ज्येष्ठा गौरींचे होणार आगमन; दा. कृ. सोमण यांची माहिती

ज्येष्ठा गौरींचे १७ सप्टेंबरला आगमन, १८ सप्टेंबरला पूजन आणि १९ सप्टेंबरला विसर्जन करावे, अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. ज्येष्ठा गौरी पूजनाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही जाणून घ्या.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: गुरुवार १७ सप्टेंबर रोजी सायं. ७:५२ पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असेपर्यंत लाडक्या ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार असल्याची माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी त्यांचे पूजन करावयाचे आहे.

चंद्र मूळ नक्षत्रात असताना शनिवार १९ सप्टेंबर रोजी त्यांचे विसर्जन करावयाचे आहे. ज्येष्ठा गौर म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती-आदिशक्ती आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून ही निर्मिती-आदिशक्तीची पूजा असते. निर्मिती शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

काही प्रदेशात हिला महालक्ष्मी म्हणतात. परंपरेप्रमाणे काही प्रदेशात खड्याच्या गौरी पूजल्या जातात, काही ठिकाणी तेरडा वनस्पती गौरी म्हणून पूजतात. तर काही ठिकाणी मुखवटे धान्यांच्या राशीवर ठेवून पूजतात.

यावेळी १६ प्रकारचे नैवेद्य दाखविण्यात येतात. ही निसर्गशक्तीची पूजा असते. सासरी गेलेली कन्या लाडाची गौर म्हणून माहेरी येते म्हणून हा उत्सव साजरा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT