पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयीत आरोपी Pudhari Photo
ठाणे

कल्याण-मलंगगड मांडवली दरम्यान तरूणाचा निर्घृण खून

संशयित आरोपींना कोळसेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडवर मंगळवारी (दि.24) मांडवली दरम्यान तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. जुना वाद मिटविण्याच्या उद्देशाने आयूब शेख या तरूणाला कल्याण पूर्वेकडील नांदिवली परिसरात असलेल्या लक्ष्मीनगर येथे बोलविले होते. मात्र मांडवलीदरम्यान वाद मिटण्याऐवजी वाढल्यानंतर आयूब शेख याला चॉपरने सपासप वार करून त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिासांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे. सुजल जाधव आणि भावेश शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

यासोबत पसार झालेल्या दिनेश लंके आणि अजित खाडे या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. आयूब शेख हा कोळसेवाडी परिसरात राहतो. त्याचा मागील काही दिवसांपूर्वी जणांबरोबर वाद होता. हा वाद मिटविण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आयूबला नांदिवली जवळच्या लक्ष्मीनगरात बोलविले होते. आयूब याच्यासोबत त्याचे मित्र अनिल वाल्मिकी आणि सूरज चटोले हे दोघे होते. वाद मिटविण्यासठी दिनेश लंके, अजित खाडे, सुजल जाधव आणि भावेश शिंदे हे चौघे आले. आयूबला भावेश शिंदे आणि सुजल जाधवने बोलावले होते. मांडवली सुरू असतानाच दुचाकीवरून दिनेश लंके आणि अजित खाडे आले. या दोघांनी आल्याआल्या आयूबला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली.

यावेळी अजितने कमरेला खोचलेला चॉपर बाहेर काढून आयूबचा कोथळा बाहेर काढला. आयुब रक्तामध्ये तडफडत जागीच ठार झाला. हे पाहून चौघांनी तेथून पळ काढला. आयूबचे मित्र अनिल वाल्मीकी आणि सूरज चटोले यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केल्यानंतर आयुबचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला. या घटनेनंतर परिसरात काही काळ भितीचे वातावरण पसरले होते. आयूबच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत दोघांना अटक केली आहे. या हत्याकांडातील पसार झालेले मुख्य मारेकरी दिनेश लंके आणि अजित खाडे या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT