ठाणे

धक्कादायक! भररस्‍त्‍यात प्रेयसीची डोक्‍यात लोखंडी पाना घालून निर्घृण हत्या

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन डेस्क : वसईत प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या केल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. लोखंडी पाण्याने डोक्यावर घाव घालून प्रेयसीला जागीच ठार केले. ही घटना वसई पूर्व परिसरातील चिंचपाडा भागात आज सकाळी ८ वा. च्या सुमारास घडली. हत्तेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरती यादव (वय २०) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी रोहित यादव या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोखंडी पाना डोक्यात मारून ही हत्या होत असताना घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. ही हत्या थांबवण्याऐवजी उपस्थितांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. माथेफिरू रोहित यादवला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT