Gangster Pujari pudhari photo
ठाणे

Thane crime : गँगस्टर पुजारीचा ताबा ठाणे पोलिसांकडे

10 कोटींच्या खंडणी प्रकरणाचा तपास होणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या 10 कोटीच्या खंडणी प्रकरणी गँगस्टर रवी पुजारीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ठाणे खंडणी विरोधी पथकाने जिल्हा मध्यवर्ती कारागृह कर्नाटक येथून 17 मार्च रोजी ताब्यात घेऊन ठाणे न्यायालयात बुधवारी हजर करण्यात आले. ठाणे मोक्का विशेष न्यायालयाने रवी पुजारीला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गँगस्टर रवी पुजारी याने 2017 च्या कालावधीत बांधकाम व्यवसायीकाकडे 10 करोड रूपयाची खंडणीची मागणी करून खंडणी न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती व त्यानंतर सदर व्यवसायीकाचे कार्यालयावर फायरींग करण्याकरीता त्याचे हस्तक पाठवीले होते.

रवी पुजारी यापुर्वीच्या कालावधीत परदेशात राहुन गुन्हे करीत होता. त्याचे विरूध्द आतापावेतो विविध ठिकाणी सुमारे 44 गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांची नोंद असुन त्यास पकडण्याच्या अनुषंगाने त्याची रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली होती.

सन 2019 मध्ये रवी प्रकाश सुल्या पुजारी उर्फ रवी पुजारी ( वय 57 वर्षे, रा.ठि. ओम नमः शिवाय हाऊस, ब्रिज जवळ, मलमे, उडपी, मँगलोर, कर्नाटक) यास रिपब्लीक ऑफ सेनेगल देशात पकडण्यात आले होते.

ठाणे पोलिसांनी बुधवारी 18 मार्च रोजी ठाणे विशेष मोका न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. संजय मोरे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय घोरपडे करत आहेत.

बंगलोर जिल्हा कारागृहातून घेतले ताब्यात

परदेशातून प्रत्यापन करून आणलेला गँगस्टर रवी पुजारी ला खंडणी आणि जिवे ठार मारण्याच्या धमकी बाबत अनेक गुन्ह्यात समाविष्ट असल्याने त्याला कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त होता. कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये बांधकाम व्यवसायिकाला दहा कोटीची खणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात ठाणे गुन्हे शाखा खननिविरोधी पथकाने बेंगलोर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात संपर्क साधून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत अखेर 17 मार्च रोजी ताब्यात घेऊन ठाण्यात आणण्यात आले.

परदेशात बसून खंडणीखोरीचा धुडगूस

रिपब्लीक ऑफ सेनेगल या देशात बसून मुंबई शहरामध्ये विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम व्यावसायिकाकडून कोट्यावधी रुपयाची खंडणी मागून वेळप्रसंगी त्यांच्या कार्यालयावर गोळीबार करीत जीवघेणे हल्ले केल्याची अनेक गुन्हे पुजारावर दाखल होते. त्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस जारी करून परदेशातून प्रत्यारोपण करीत प्रत्यारोपण करीत भारतात आणण्यात आले. त्यावेळी त्याच्यावर खंडणी, खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी, गोळीबार अशी 44 गुन्हे दाखल होते. त्यामध्येच ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील कासारवडवली पोलीस ठाण्यात रवी पुजारीच्या विरोधात दहा कोटीची खंडणी आणि ठार मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल होता. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने त्याला बुधवारी ठाणे न्यायालयात हजर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT