Metro tickets available on Uber : उबर ॲपवरही आता मिळणार मेट्रो तिकीट

देवेंद्र फडणवीस : कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार
Metro tickets available on Uber
उबर ॲपवरही आता मिळणार मेट्रो तिकीट pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईतील मेट्रो सेवेसाठी आता प्रवाशांना उबर ॲपवरूनही तिकीट काढता येणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करणे तसेच शेवटच्या टप्प्यातील वाहतुकीच्या पर्यायांशी सहजपणे जोडले जाणड सोपे होईल. ही सुविधा सुरुवातीला मेट्रो लाईन 2ए आणि 7 साठी उपलब्ध असेल, त्यानंतर लाईन 9 आणि 2बी साठी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडियात पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर बनवण्याच्या तसेच डिजिटल वाहतुकीच्या एकत्रीकरणाद्वारे लास्ट माईल टप्प्यातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई वन ॲप, मुंबई वन कार्ड, व्हॉट्सॲप तिकीटिंग आणि आता उबर इंटिग्रेशनमुळे, प्रवाशांना मेट्रो सेवांचा लाभ घेण्यासाठी अनेक सोयीस्कर मार्ग उपलब्ध झाले आहेत.

Metro tickets available on Uber
Alphonso mango production : हापूसची एपीएमसीची यंदाची गुढी केवळ 10 हजार पेट्यांची

सध्या यात्री, इक्सिगो, नवी, ईएमटी, टम्मॉक, ट्रिपोझो, वन तिकीट, ऑटोपे, मॅजिकपिन, चलो, रेडबस, हायवे डिलाइट आणि पेलोकल यांसारख्या अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुखकर आणि सुलभ करण्याचा मानस आहे. त्यासाठी बेस्ट बस कनेक्टिव्हिटी, पादचारी पूल आणि मेट्रो स्थानकांजवळील पार्किंग सुविधा अधिक मजबूत केल्या जात आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Metro tickets available on Uber
Third Mumbai development plan : तिसरी मुंबईच्या निर्मितीने गावठाण विस्तार कळीचा मुद्दा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news