Eknath Shinde Pudhari
ठाणे

Eknath Shinde: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकार मदत करणार; शेतकऱ्यांच्या मुलींच्या सामुदायिक विवाहाची जबाबदारी घेण्याचेही आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: दुष्काळग्रस्त शेत कऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही ठाण्यातील टेंभी नाका येथे चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गेश्वरी मातेच्या आगमन सोहळ्यात बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

टेंभी नाका येथील श्री जय अंबे माँ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा केला जातो.

त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, यावर्षी दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे, सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. बळीराजाला मदत करण्यासाठी सरकार हात आखाडता घेणार नाही, केंद्र सरकारचे पथक दुष्काळाची पाहणी करून गेले आहे, त्यांची मुख्यंत्र्यांसोबत बैठकही झाली आहे.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळा संदर्भात दीर्घकाळ चर्चा केली, केंद्र सरकारही या दुष्काळाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून बळीराजाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणऱ्या सवलती त्यांना मिळतीलच, परंतू शेतकऱ्यांच्या ज्या मुलींची लग्ने ठरली आहेत. त्यांचे लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात लावण्यासाठी शिवसेना

जबाबदारी उचलणार असल्याचे ते म्हणाले शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होवू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या उत्सवाचे हे 48 वे वर्षे आहे.

टेंभी नाका येथील श्री जय अंबे माँ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा केला जातो.

या उत्सवाला ठाणे शहरापुरते मर्यादित स्वरूप न राहता मुंबई, नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या विविध भागांतून भाविक हजेरी लावतात.

ढोल-ताशा, झांज पथक, मिरवणूकीवर होणारी फुलांची उधळण आणि भाविकांच्या जल्लोषात ठाण्याच्या मानाची देवी असलेल्या टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरी सोमवारी घटस्थापनेला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

या मिरवणूकीत महिलांचे लेझीम पथक, ढोलताशा पथक सहभागी झाले होते. वारकरी बांधवांनी देवीचा जागर केला. आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्य सादर केले. याशिवाय विविध प्रांताच्या लोककलांचेही दर्शन या मिरवणूकीत घडले. ठाणेकरांनी दुतार्फा देवीची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. खासदरा नरेश म्हस्के यांच्या सह शिवेसनेचे नेते, पदाधिकारी उपस्थितीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT