Thane Railway Station: देशात ठाणे स्टेशन सर्वाधिक वर्दळीचे ९.३ कोटी प्रवाशांची ये-जा; कल्याण दुसऱ्या क्रमांकावर

कल्याण स्थानक ८.३ कोटी प्रवाशांसह दुसऱ्या क्रमांकावर; पहिल्या दहा स्थानकांमध्ये मुंबई महानगर प्रदेशातील पाच स्थानकांचा समावेश
Thane Railway Station
Thane Railway StationPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: देशातील सर्वाधिक प्रवासी वर्दळ असलेल्या रेल्वे स्थानकांच्या यादीत ठाणे रेल्वे स्थानकाने अव्वल स्थान पटकावले आहे. वर्षभरात तब्बल ९.३ कोटी प्रवाशांची ये-जा ठाणे स्थानकातून झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांची प्रचंड गर्दी या आकडेवारीतून अधोरेखित झाली आहे.

विशेष म्हणजे, याच यादीत कल्याण स्थानकाने ८.३ कोटी प्रवाशांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे. देशातील पहिल्या दहा सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांमध्ये ठाणे, कल्याण, सीएसएमटी, पनवेल आणि दादर या मुंबई महानगर प्रदेशातील पाच स्थानकांचा समावेश असल्याने या परिसरातील रेल्वे वाहतुकीचा प्रचंड व्याप स्पष्ट झाला आहे.

Thane Railway Station
Palghar Crime: पालघर शहरात वृद्ध महिलेची हत्या; चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

भारतीय रेल्वेने सर्वाधिक प्रवासी वाहतूक असलेल्या १०० स्थानकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत ठाणे स्थानकाने देशातील अनेक प्रमुख रेल्वे केंद्रांना मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. देशातील महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवरील स्थानकांच्या तुलनेत ठाण्याने घेतलेली आघाडी विशेष लक्षवेधी ठरली आहे.

मुंबईकडे नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि अन्य कामांसाठी दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी ठाणे हे महत्त्वाचे केंद्र आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांमुळे ठाणे स्थानकावर सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवाशांची मोठी वर्दळ असते.

Thane Railway Station
Palghar District: जिल्हा मुख्यालय गाठताना अर्ध्या जिल्ह्याची दमछाक; 20 किमी रस्त्यासाठी तासांचा कालावधी

नवी दिल्ली स्थानक ३.९ कोटी प्रवाशांसह सातव्या क्रमांकावर, तर ताम्बरम स्थानक आठव्या क्रमांकावर आहे. दादर स्थानकाने सुमारे ३.२ कोटी प्रवाशांसह नववा क्रमांक मिळवला आहे. चेन्नईतील एम.जी.आर. चेन्नई सेंट्रल स्थानक दहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे देशातील पहिल्या दहा स्थानकांच्या यादीत मुंबई आणि आसपासच्या परिसरातील स्थानकांचे वर्चस्व दिसून येते.

मुंबई सेंट्रल स्थानकाने सुमारे २.२ कोटी प्रवाशांसह १६ वा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय तिरुपती, कानपूर सेंट्रल, विशाखापट्टणम, गोरखपूर, तिरुवनंतपुरम सेंट्रल, भुवनेश्वर, आनंद विहार टर्मिनल, भोपाळ, वाराणसी, कोझिकोड, मथुरा जंक्शन, कोईम्बतूर, नागपूर आणि वांद्रे जंक्शन या स्थानकांचाही यादीत समावेश आहे.

ठाण्याच्या वाढत्या महत्त्वावर शिक्कामोर्तब

ठाणे हे केवळ मुंबईला जोडणारे उपनगरीय स्थानक राहिलेले नाही, तर मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा बनले आहे. ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांमधून विविध दिशांना प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. नोकरी-व्यवसायासाठी मुंबईत जाणारे चाकरमानी, विद्यार्थी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणारे नागरिक यांच्यामुळे या स्थानकांवरील गर्दी सातत्याने वाढत आहे.

कल्याण दुसऱ्या क्रमांकावर; हावडा तिसरे

प्रवासी संख्येच्या या यादीत ठाण्यानंतर कल्याण स्थानकाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. कल्याणमधून ८.३ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. पश्चिम बंगालमधील हावडा स्थानक ६.१ कोटी प्रवाशांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि सियालदाह स्थानकांवर प्रत्येकी ५.१ कोटी प्रवाशांची नोंद झाली आहे. पनवेल स्थानकातून सुमारे ४.६ कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून, त्याने सहावा क्रमांक मिळवला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news