Palghar Crime: पालघर शहरात वृद्ध महिलेची हत्या; चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

वजली पाड्यातील तुलसी दर्शन सोसायटीत घटना; घरातील सामान अस्ताव्यस्त, सोन्याचे दागिने गायब, फॉरेन्सिक पथकाकडून तपास
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

पालघर: पालघर शहरातील वजली पाडा मधील तुलसी दर्शन सोसायटी मधील एका सदनिकेत राहणाऱ्या 61 वर्षीय वृद्धेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत वृद्धा शोभा पंडित यांचा यांच्या घराचा दरवाजा सकाळी बराच वेळ बंद असल्याने शेजार्यांनी माहिती घेतली.तर त्यांचा मृतदेह घरात आढळून आला. घरातील कपाटातील सामान अस्थाव्यस्त पडलेले होते. गळ्यातील सोन्याचे दागिने गायब होते. हे सर्व पाहताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती दिली.

Crime News
Palghar District: जिल्हा मुख्यालय गाठताना अर्ध्या जिल्ह्याची दमछाक; 20 किमी रस्त्यासाठी तासांचा कालावधी

परिस्थीती पाहता हा प्रकार चोरीच्या उद्देशाने घडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातं आहे. तेंव्हा त्यांनी तात्काळ पालघर पोलिसांना फोन करून घडलेली घटना कळवल्या बरोबर तात्काळ दाखल झाले.

चोरीच्या उद्देशाने हि घटना घडली असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालघर पोलीस अधिक्षक यतिश देशमुख स्वतः घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी अधिकचे पुरावे गोळा करण्यासाठी काम सुरू केले आहे पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Crime News
Palghar Leopard Attack: पालघरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

शेवटची माहिती हाती आली असता पोलीस आरोपींचा शोध घेण्यात पथके रवाना केली असून लवकरच आरोपी गजा आड करू असे पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

पालघर शहरात वाढणारी गुन्हेगारी लक्षात घेता एकेकाळी ही शांततेचे शहर असलेले पालघर सध्या गेल्या काही महिन्यात वारंवार गुन्हे घडत असल्याने या ठिकाणी जेष्ठ नागरिक महिला व लहान मुलांना भीतीच्या वातावरणात वावरावे लागत आहे की काय?असा प्रश्न निर्माण होतो.नवरात्र त्यानंतर दिवाळी असा यापुढे सणांचा कालावधी असल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगावी लागणार हे निश्चित आहे.

पालघर जिल्ह्यात सध्या वाढवण व इतर प्रकल्प येत असल्याने त्यानुसार होणारे आंदोलन उपोषण रास्ता रोको तसेच विविध दौरे या सर्वांच्या बंदोबस्तात पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे मात्र सत्य नाकारून चालणार नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news