ठाणे ः ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणार्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील 448 बस आणि शिवाई प्रकल्पातील 50 ई-बसेस कार्यरत आहेत. भविष्यात या बसेसची संख्या आणखी वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
अनेक प्रवाशांकडून ई-बस सेवेत पास प्रणालीची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा प्रवास देण्यासाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पास योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्ये
उपलब्धता : 9 मीटर ई-बस, 12 मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवेमध्ये हे पासेस उपलब्ध असतील.
(ई-शिवनेरी बससेवा वगळून)
मासिक पास : (30 दिवस): 20 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून 30 दिवसांसाठी पास दिला जाईल.
त्रैमासिक पास : (90 दिवस) : 60 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून 90 दिवसांचा पास उपलब्ध होईल.
सेवा वर्गातील लवचिकता : उच्च सेवा वर्गाचा पास (ई-बस) वापरून प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील.
निमआराम किंवा साध्या बसच्या पासधारकांना ई-बसने प्रवास करायचा असल्यास, दोन्ही सेवांतील भाड्यातील फरक 100% दराने भरून तिकीट घेऊन प्रवास करता येणार आहे.