आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत टी-शर्ट, मेडलचे अनावरण करण्यात आले. pudhari photo
ठाणे

Dombivli Friendship Run 2026 : धावूया मैत्रीसाठी, एकत्र येऊया डोंबिवलीसाठी

आरोग्याचा संदेश देत २९ नोव्हेंबरला ‘फ्रेंडशिप रन’

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : आरोग्य, मैत्री आणि एकजुटीचा संदेश देणाऱ्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६’चे तिसरे पर्व २९ नोव्हेंबरला डोंबिवलीत रंगणार आहे. ‘डोंबिवली शहराचा उत्सव’ ही संकल्पना घेऊन आयोजित या उपक्रमाच्या थीम टी-शर्ट आणि मेडलचे अनावरण भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘नमो रमो नवरात्री’च्या प्रांगणात करण्यात आले. यंदा दहा हजार धावपटूंचा सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी ठेवले आहे.

कल्याण डोंबिवली रनर्स (केडीआर) आणि ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या स्पर्धेत २१.१ किमी, १० किमी आणि ५ किमीच्या वेळबद्ध धावा, तसेच ५ किमी आणि १.६ किमीच्या आनंदधावा अशा पाच प्रकारांचा समावेश आहे. वेळबद्ध धावांतील विजेत्यांसाठी सुमारे तीन लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, आठ ते १६ वयोगटांतील मुलांसाठी १.६ किमीची आनंदधाव विनामूल्य असेल.

मुलांमध्ये लहानपणापासून व्यायामाची आवड, शिस्त आणि आत्मविश्वास वाढावा, हा त्यामागील हेतू आहे. फिटनेस, मैत्री आणि डोंबिवलीच्या संस्कृतीचा संगम असलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. नोंदणी करणाऱ्या प्रत्येक सहभागीला ड्राय-फिट टी-शर्ट, पदक, मार्गावर पाणी आणि अल्पोपहार आणि पात्रता प्रमाणपत्रही मिळेल.

सर्व सहभागींसाठी सहभाग प्रमाणपत्र आणि छायाचित्रे विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ असून इच्छुक धावपटूंनी www.dombivlikarfriendshiprun.com या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणीचे आवाहन रवींद्र सकपाळ आणि सुरज शेट्टी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT