MLA Ravindra Chavan New School Building Bhoomipujan (Pudhari Photo)
ठाणे

Dombivli KDMCC School Building |डोंबिवलीत केडीएमसी शाळेची नवी इमारत

MLA Ravindra Chavan | आमदार रविंद्र चव्हाणांच्या हस्ते भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

New School Building Bhoomipujan

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक ८२ च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. डोंबिवली पूर्वेतील ब्राह्मणसभा हॉलच्या मागे असलेल्या या शाळेच्या भूखंडावर आलेल्या शाळेची इमारत पूर्ण जीर्ण झाली होती. आता याच शाळेला नवी झळाळी मिळणार आहे.

शाळेची नवीन इमारत तळ ३ मजली उभारण्यात येणार असून त्यामध्ये १३ वर्ग खोल्या, १ हॉल, १ मुख्याध्यापक रूम, १ प्रवेशवर्ग अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. यासाठी ११६.७० लाख रूपये शासनाचा निधी, तर ३७८.२४ लाख रूपये महापालिकेचा निधी असे एकूण ४९४.९४ लाख रूपयांची तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

साधारणत: एक वर्षाच्या कालावधीत सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. शाळेच्या नव्या इमारतीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी भौतिक सोयी-सुविधा वाढविण्याचे हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. पालक, नागरिक आणि समाजातील सर्व स्तरातून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे.

भूमिपूजन समारंभाला महापालिकेचे माजी पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त प्रसाद बोरकर, शिक्षण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT