ठाणे

ठाणे : सीआयएसएफचा जवान रायफल आणि जिवंत काडतुसांसह फरार

अमृता चौगुले

बोईसर (ठाणे), पुढारी वृत्तसेवा : तारापूर अणुशक्ती केंद्रात कार्यरत असलेला सीआयएसएफचा एक जवान बंदूक आणि जिवंत काडतुसे घेऊन फरार झाला आहे. शुक्रवार दुपार पासून जवान मनोज यादव गायब झाला आहे. एक रायफल आणि तीस जिवंत काडतुसे त्याच्या ताब्यात असल्याचे अधिका-यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलीस आणि सीआयएसएफकडून जवानाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील प्रकल्पांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात कार्यरत असलेला जवान मनोज यादव गुरुवारी (दि. 01) दुपारी तारापूर अणुशक्ती केंद्रात कामावर असताना अचानकपणे आपल्या शस्त्रास्त्रांसह निघून गेला. त्याच्या ताब्यात एलएमजी रायफल आणि 30 जिवंत काडतुसे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तारापूरच्या सीआयएसएफ कॉलनीमध्ये तो एकटा वास्तव्य करीत होता.

कामावरून गायब झाल्यानंतर जवान काही तासांनी कामावर हजर होण्याच्या प्रतीक्षेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे स्थानिक अधिकारी होते. सायंकाळ पर्यंत तो माघारी परतला नाही. त्याचा तपास लागत नसल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्यावतीने माहिती तारापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT