ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरून प्रवास करणारे काही प्रवासी वर्गापैकी 30% प्रवासी नियमित तिकीट प्रवास करत असतात असा आरखडा मध्य रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. म्हणजेच मध्य रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मध्य रेल्वे प्रशासनाने दर दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांमधले बहुतांश प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. व या फुकट्या प्रवाश्यांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन नवनवीन शक्कल लढवत असते. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये मध्य रेल्वेमार्गावर अजब प्रकार घडल्याचे कळले. काही विशिष्ट प्रवाशांने बनावट लोकल तिकीट व लोकलचे मासिक पास बनवले होते. अशा प्रवाश्यांचा पर्दाफाश काही तिकिट तपासणीसाने केला आहे.
ऐन गर्दीच्या काळामध्ये तिकीट तपासनीसांची नजर चुकवून भरपूर फुकटे प्रवाशी प्रवास करतात. मात्र अलीकडे तिकिटासाठी पैसे न खर्च करता देखील वातानुकूलित लोकल सेवेने व प्रथम दर्जाच्या लोकलने प्रवास करणे आधुनिक तंत्रज्ञानाने शक्य होते. मध्य रेल्वे प्रशासनाने गेल्याच आठवड्यात तब्ब्ल 13 बनावट तिकीट वापरणाऱ्या प्रवाशांना अटक करत त्यांच्यावर कारवाई केली आहे. या मध्ये काही प्रवाशांनी रेल्वेच्या युटीएस अँपला हॅक करून म्हणजेच खाचून विविध लोकल रेल्वे सेवांचे पास बनवले होते. तर काही फर्जी प्रवाशांने कागदी तिकिटांवरील तारखेच्या आकड्यांमध्ये पेनाने घोळ केले होते. मात्र अशा प्रवाशांना तिकीट तपासणीसाने अटक करत कारवाई केली आहे.
अशा प्रकारचा गुन्हा अंबरनाथ मध्ये राहणाऱ्या विवाहित जोडप्यावर झाला होता. पती कॉम्प्युटर इंजिनिअर आणि पत्नी शिक्षिका होती दोघांने निरनिराळे अँपचे वापर करून वातानुकूलित लोकल सेवेने प्रवास करायचे मात्र 24 नोव्हेंबर, रोजी या जोडप्याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील तिकीट तपासणीसांद्वारे पर्दाफाश करण्यात आला. त्यांवर मध्य रेल्वे प्रशासनांद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशा प्रकारे फुकटे प्रवाशी निरनिराळी शक्कल लढवून फुकट प्रवास करत असतात. अशा स्थितीत प्रत्येक लोकल रेल्वे सेवांमध्ये तिकीट तपासनीस नियुक्त केल्याने असे प्रकार वेळीच थांबतील. असे रेल्वे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार असे गुन्हे करणाऱ्या प्रवाश्यांवर रेल्वे अंतर्गत 30,000 इतपत दंड आकारण्यात येऊ शकतो अथवा दंड न भरल्यास तब्ब्ल 7 वर्ष तुरुंगवास शिक्षा देण्यात येते.