Love Jihad file photo
ठाणे

Love Jihad: उल्हासनगरात ‌‘लव्ह जिहाद‌’; खोटे नाव सांगून हिंदू तरुणीशी विवाह, 7 जणांवर गुन्हा

फिर्यादी हिंदू महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी इमरान शौकिन शेख (वय 33) याने उल्हासनगरात राहत असताना स्वतःचे नाव “विजय” सांगून तिची फसवणूक केली.

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर: उल्हासनगरात खोटे नाव सांगून हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यवर्ती पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी इमरान शेखसह त्याच्या दोन भावांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

फिर्यादी हिंदू महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी इमरान शौकिन शेख (वय 33) याने उल्हासनगरात राहत असताना स्वतःचे नाव “विजय” सांगून तिची फसवणूक केली.

प्रेमसंबंध निर्माण करून तिला बिहारमधील मूळ गावी नेले व मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे विवाह केल्याचे तक्रारीत नमूद आहे. विवाहानंतर आरोपी व त्याच्या कुटुंबीयांनी तिच्यावर बुरखा आणि हिजाबची सक्ती केली.

गोमांस खाण्यासाठीही दबाव टाकत हिंदू देवी-देवतांचा सतत अपमान चालवला.सासरच्या मंडळींकडून शिवीगाळ, मारहाण मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी इमरान शेख, त्याचे वडील शौकिन शेख, आई राबिया शेख, भाऊ रिझवान शेख, सलमान शेख, शहबाज शेख आणि अरबाज शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सलमान आणि शहबाज यांनी फिर्यादीकडे अश्लील नजरेने पाहणे व अयोग्य स्पर्श केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT