ठाणे: कशेळी-ठाणे मार्गावरील कशेळी पुलावरून चंदनवाडी परिसरातील विकास शर्मा या 25 वर्षीय तरुणाने खाडीत उडी मारल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेनंतर विविध यंत्रणांकडून सुमारे तीन तास शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र तरुणाचा शोध लागलेला नव्हता.
गुरुवारी सकाळी कशेळी खाडी किनारी स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीने 01-बोटीच्या साह्याने खाडीमध्ये शोधकार्य करण्यात आले असून, सुमारे 04-तासांच्या प्रयत्नानंतर सदर व्यक्तीचा मृतदेह कशेळी खाडीमध्ये आढळला. मृतदेह कापूरबावडी पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शाही के द्वारे पाठविण्यात आल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिली.
मृतदेह सापडलेला तरुण विकास शर्मा (25) रा- भोला भैया चाळ, चंदनवाडी, ठाणे असे तरुणाचे नाव आहे. त्याने बुधवारी दुपारी कशेळी ब्रिजवरून खाडीमध्ये उडी मारली होती. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, ठाणे अग्निशमन दल तसेच भिवंडी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक मच्छीमारांच्या बोटीच्या साहाय्याने खाडी परिसरात शोधकार्य सुरू करण्यात आले. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी खाडीकिनारी आणि पाण्यात सखोल शोधमोहीम राबविली. मात्र सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतरही विकास यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अंधारामुळे शोध मोहीम थांबाविण्यात आली.
गुरुवारी सकाळीच स्थानिक मच्छिमार यांच्या बोटीच्या सहाय्याने शोध सुरू करण्यात आला आणि तब्बल चार तासाच्या आता प्रयत्नानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि अग्निशमन दल यांच्या प्रयत्नांना यश आले आणि मृता वस्तीत विकास शर्मा याचा मृतदेह कशेळी खाडीत सापडला.
ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सदरचा मृतदेह खाडीतून बाहेर काढून कापूरबावडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला पोलिसांनी सदर मृत्युंजय हा सौ विच्छेदनासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात केव्हाही के द्वारे पाठविण्यात आला दरम्यान आत्महत्येचे कारण अद्यापही समजलेले नाही.