ठाणे

Thane News : भिवंडीत तानसा जल वाहिनी बदलण्याचे काम सुरू

मुंबई शहरात होणार 15 टक्के पाणीकपात

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणातील जलवाहिनी बदलण्याचे काम भिवंडी तालुक्यातील गुंदवली येथे सोमवार पासून सुरु करण्यात आले आहे. हे काम मंगळवार सकाळी 10 वाजेपर्यंत हे चालणार आहे. त्यामुळे भांडुप जल शुध्दीकरण केंद्रात होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असून त्यामुळे मुंबईत सुमारे 15 टक्क्यांपर्यंत पाणी कपात होणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई मनपा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

तानसा जलवाहिनी 2750 मिमी व्यासाची असून ही पाईप लाइन बदलून 3000 मिमी व्यासाची नवीन जल वाहीनी टाकण्यात येणार आहे. यामुळे मुंबई शहराला सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. या कामा मुळे मुंबई शहर, मुंबई पूर्व उपनगर, मुंबई पश्चिम उपनगर या भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. गुंदवली येथे सोमवार पासून जल वाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असून हे काम मंगळवार पर्यंत सुरु राहणार असल्याने मुंबई शहरातील 15 टक्के पाणी कपात होण्याची शक्यता आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे उपजल अभियंता पराग सेठ यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT