Child Abuse Pudhari
ठाणे

Child Abuse: भिवंडीत सावत्र आईची क्रूरता; ‘मम्मा’ म्हटल्याच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुरडीच्या डोळ्यात मिरची पूड

बापगावातील अमानुष प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल; सावत्र आईसह तिघांविरुद्ध पडघा पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : मातृत्वाला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बापगाव या ठिकाणी घडली आहे. जेथे दत्तक घेतलेल्या तीन वर्षाच्या चिमुरडीने दुसऱ्या महिलेस मम्मा म्हटल्याच्या रागातून, सावत्र आईने चिमुरडीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिलशान शेख असे अमानुष मारहाण करणाऱ्या सावत्र आईचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बापगाव येथील दिलशान शेख या महिलेने तीन वर्षाच्या चिमुरडीस दत्तक घेतले होते. ती यांच्यासोबत बापगाव येथे राहत असताना चिमुरडी शेजारील महिलेस मम्मा म्हटल्याचा राग दिलशान शेख या सावत्र आईस आल्याने दिलशान या महिलेने चिमुरडीस घरामध्ये कोंडून घेत तिच्या तोंडात व डोळ्यात मिरची पावडर टाकून तिला अमानुष मारहाण केली. यावेळी तिचा पती ही कृत्य करण्यापासून

पत्नीस थांबवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पडघा पोलीस ठाण्यात या मारहाण करणाऱ्या सावत्र आई दिलशान शेख पती शौकत समसुद्दीन शेख व मुलीला दत्तक देणारा उमेश येवाले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निष्पाप चिमुरडीची तिच्या ताब्यातून सोडवणूक करून तिची रवानगी बाल निरीक्षण गृहात केल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT