Bhiwandi Mayor Election Controversy Pudhari
ठाणे

Bhiwandi Mayor Election Controversy: भिवंडी महापौर निवडणुकीला धक्का; माजी महापौर विलास पाटील अटकेत

एक कोटींच्या फसवणूकप्रकरणी कारवाई; उमेदवारी अर्जासाठी न्यायालयाकडे सवलतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडीतील कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना एक कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी ठाणे पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विलास पाटील यांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

विलास पाटील यांच्या अटकेनंतर भिवंडी पालिका महापौर पदाच्या निवडणुकीच्या राजकीय नाट्याला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यात विलास पाटील यांच्याकडून न्यायालयासमोर 16 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सवलत मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे.

महानगरपालिका निवडणुकीनंतर विलास पाटील व भाजपा आमदार महेश चौघुले यांच्या गटात छत्रपती शिवाजी महाराज चौकात 18 जानेवारी रोजी हाणामारी व राडा झाला होता. या प्रकरणात विलास पाटील फरार होते. त्यांना 7 फेब्रुवारी रोजी अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. विलास पाटील हे भिवंडी महानगरपालिका राजकारणात नेहमी किंग मेकरच्या भूमिकेत राहिले आहेत. आत सुद्धा त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटासोबत जवळीक वाढलेली असून सदस्यांची जमवाजमव सुरू केली होती. पाटील यांच्या अटकेच्या बातमी ंतर भिवंडीत शिवसेना शिंदे गटाकडून भादवड टेमघर नवीबस्ती या परिसरात नगरसेवक बाळाराम चौधरी, रोहित चौधरी व दिनमोहमद यांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती.

अटक राजकीय हेतूने

या गुन्ह्यात विलास पाटील यांचा कोणताही संबंध नाही. दाखल गुन्ह्यात सुद्धा त्यांचे नाव समाविष्ट नसताना हा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असून यामध्ये विलास पाटील यांना नाहक गोवण्यात आला असल्याचा आरोप विलास पाटील यांचे वकील ॲड.नारायण अय्यर यांनी केला आहे. यावर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे.

काय आहे प्रकरण :

नवलकिशोर सोनी यांनी मौजे पोगाव येथील जागा विकसित करायची असून त्यामध्ये भागीदार म्हणून ब्रिजेश सिंह यांना घेऊन नवल सोनी यांनी त्यांच्या जवळून 25 सप्टेंबर 2014 मध्ये एक कोटी रुपये आपल्या सुमित प्रॉपर्टी डेव्हलपर्स या बँक खात्यात जमा केले. या जमिनीपैकी सर्व्हे क्रमांक 86/6 मधील 1726 चौरस मीटर जागा विलास पाटील यांच्या पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील यांना विक्री करून त्यांच्या जवळून 1 कोटी 8 लाख 77 हजार 580 रुपये घेऊन नवलकिशोर सोनी यांनी सदर रक्कम सुमित प्रॉपर्टी डेव्हलपर्सच्या नावे घेऊन नंतर ही रक्कम आपल्या मालकीच्या श्री राधे रियलेटर्स प्रा. लि.या कंपनीच्या नवे वळवून घेत आपली व कंपनीची फसवणूक केल्याबाबत ब्रिजेशप्रताप सिंह यांनी 19 जून 2025 मध्ये निजामपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नवलकिशोर सोनी विरोधात दाखल करून योगुन्याचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT