FDA Pudhari
ठाणे

Expired Food: भिवंडीत मुदतबाह्य अन्नपदार्थांचा अवैध साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम सुरूच

या वेळी ५२ लाखांचा अवैध अन्नसाठा जप्त करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: अन्न व औषध प्रशासन ठाणे परिमंडळाने स्थानिक पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी परिसरात एक व्यापक मोहीम राबवून, बड्या कंपन्यांच्या गोदामांमधून विल्हेवाटीच्या नावाखाली मुदतबाह्य व खराब झालेले अन्नपदार्थ पुन्हा बेकायदेशीररित्या बाजारात विक्री करणार्या मोठ्या आंतर-राज्य संघटित साखळीचा पर्दाफाश केला.

ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या रॅकेटमध्ये नामांकित व विश्वासार्ह ब्रँड्सचा मुदतबाह्य माल रिपॅक करून बाजारात विकला जात असल्याचे उघड झाले आहे. या वेळी ५२ लाखांचा अवैध अन्नसाठा जप्त करण्यात आला.

भिवंडीतील ८ वेगवेगळ्या व्यावसायिक आस्थापना आणि गोदामांवर अन्न व औषध प्रशासन (अन्न) परिमंडळ ५ चे सहाय्यक आयुक्त संतोष सिरोसिया यांच्या नेतत्वाखाली कारवाई करण्यात आली. मेसर्स मुमताज अहमद अब्दूल सत्तार , मे. एस एस ट्रेडिंग, अबुल फैजान मोइनुद्दिन अन्सारी, मे. व्हरायटी सुपर बाजार, संजार ट्रेडर्स, मे. खान सलमान अहमद शब्बीर , मे. उमर ईमाहित अली खान येथून सुमारे 45 लाख,74 हजार 30 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

सरवली (भिवंडी) येथील मे. अमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि. च्या मुख्य वेअरहाऊसवर अन्न व औषध प्रशासन (अन्न) परिमंडळ १० चे सहाय्यक आयुक्त. वाय. एच. ढाणे यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान तिथे सुमारे दीड (१.५) टन मुदतबाह्य व खराब अन्नपदार्थ अनधिकृतपणे साठविल्याचे आढळले.

अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांच्या अधिकृत फिर्यादीवरून मे. आर के ट्रेडर्सचे मालक रहमान के आणि मे. अमेझॉनचे फॅसिलिटी मॅनेजर (पश्चिम क्षेत्र) सोमशेखर बसवराज कोन्नुर व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणगाव पोलीस ठाण्यात फसवणूक आणि नियमाबाह्य अन्नविक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त वाय. एच. ढाणे यांनी संबंधित अमेझॉन वेअरहाऊस अन्न सुरक्षा परवाना तातडीने निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT