Goregaon Tempo Accident: टेम्पो अपघातात ६८ वर्षांच्या टॅक्सीचालकाचा मृत्यू; गोरेगाव येथील घटना

टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Accident
AccidentPudhari file photo
Published on
Updated on

मुंबई: टेम्पो अपघातात मझहरुल खान (६८) या टॅक्सीचालकाचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी धर्मेद्र यादव या टेम्पोचालकाविरुद्ध आरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर तो पळून गेला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

हा अपघात बुधवारी २४ जूनला सकाळी साडेअकरा वाजता गोरेगाव येथील आरे पवईकडे जाणार्‍या युनिट क्रमांक २२ जवळ झाला. इस्तेखार मझहरुल खान हा अंधेरीतील मरोळ सागबाग स्नेह सागर एसआरए सोसायटीमध्ये राहात असून तो चालक म्हणून काम करतो.

Accident
Mumbai Bridge: मुंबईतील पुलांची रखडपट्टी; वाहतुकीसाठी २०२७ पर्यंत प्रतीक्षा

मृत मझहरुल हे त्याचे वडील असून तो त्यांच्यासोबतच राहतो. त्याचे वडील टॅक्सीचालक म्हणून काम करतात. बुधवारी सकाळी आठ वाजता ते नेहमीप्रमाणे त्यांच्या कामावर निघून गेले होते.

सकाळी साडेअकरा वाजता ते युनिट क्रमांक २२ जवळ उभे होते. यावेळी तेथून भरवेगात जाणार्‍या एका टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली होती.

त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच उपचार सुरु असताना दुपारी पावणेदोन वाजता त्यांचा मृत्यू झाला.

Accident
Thane Palghar District Bank Result: ठाणे जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचा पुन्हा झेंडा

याप्रकरणी इस्तेखार खान याच्या तक्रारीवरुन आरे पोलिसांनी टेम्पोचालक धर्मेंद्र यादव याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news