Thane Crime pudhari photo
ठाणे

Bhiwandi Crime : गोदाम घरफोडीत १४ लाखांची तांबे चोरी

पाच आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी तालुका परिसरातील गोदामपट्ट्यात घरफोडी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात नारपोली पोलिसांना यश आले असून आरोपींनी घरफोडीत केलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारपोली पोलीस ठाणे हद्दीत राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत सदगुरू कंपाऊंड येथील गोदामात ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या घरफोडीत गोदामातील चोरट्यांनी गोदामाचे शटर तोडून गोदामात ठेवलेले १४ लाख ४४ हजार रुपये किमतीचे तांब्याचे विविध साहित्य चोरी केले होते. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने पोलीस निरीक्षक अतुल अडूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील,पो. उप निरीक्षक आकाश पवार व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या आधारे तपास करून दोन दिवसात संशयित आरोपींचा ठावठिकाणा माहिती करून शौकत ऊर्फ वसीम अकबरअली खान, (वय २८), गयासुद्दीन सलाहुद्दीन चौधरी, (वय २१), सलमान शाबान अली खान, (वय ३३), अंबिया सजाउद्दीन मिर्झा, (वय ३२), सर्व रा. कौसा, मुंब्रा, अब्दूल हासिम वदुत खान, (वय ३८ वर्षे), रा. उल्हासनगर नं. ५ यांना शिताफिने ताब्यात घेतले.

या आरोपींकडे कौशल्याने तपास केला असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस पथकाने या घरफोडीमधील चोरी करण्यासाठी वापरलेला टेम्पो तसेच रुपये १४ लाख ३७ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT